IMPIMP

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

by pranjalishirish
Mukesh Ambani | mukesh ambanis reliance created a record gain about 60000 crores in one day

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मनसुख हिरेन Mansukh Hiren मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या इनोव्हा गाडीच्या प्रकरणात आता नवीन माहिती समोर येत आहे. ही गाडी दोनवेळा अंबानी यांच्या घरासमोर येऊन गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

इनोव्हा कारच्या चालकाने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट वापरलं होतं. ही गाडी दोनदा मुंबईत येऊन घटनास्थळी दिसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या इनोव्हाचा सध्या शोध सुरू आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. हिरेन Mansukh Hiren हत्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी एटीएसने काल पोलीस अधिकारी सचिन वाझेंना बोलावलं होतं.

या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी वाझे काल दुपारी एटीएसच्या अधिकाऱ्यांना भेटले. या हत्या प्रकरणात एटीएसकडून वाझेंना काही प्रश्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीपासून वझे हेच करत होते. वाझेंनीच मनसुख यांचा जबाब नोंदवला होता. मनसुख यांची गाडी चोरून संशयितांनी त्यात स्फोटक ठेवून ती कार अंबानी यांच्या घराबाहेर लावली होती.
ठाणे येथील मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या घटनेचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे.
मनसुख यांची आत्महत्या की, हत्या याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
मनसुख हिरेन Mansukh Hiren मृत्यू प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.

Also Read :

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

महिला दिनानिमित्त मोठी घोषणा; विद्यार्थिनींना देण्यात येणार मोफत बससेवा

Related Posts