IMPIMP

Aadhaar Card | तुमचं ‘आधार कार्ड’ बनावट तर नाही ना ?; कसं ओळखाल ? जाणून घ्या सोप्या टिप्स

by nagesh
Aadhaar Card | how to find aadhaar card given to you is fake or not fact check

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Aadhaar Card | भारताच्या रहिवाशांना योग्य प्रकारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक 12 अंकी अनियत क्रमांक देते ज्याला आधार क्रमांक म्हणतात. कोणतेही वय आणि लिंग असणारा भारताचा रहिवासी स्वेच्छेने आधार क्रमांक मिळवण्यासाठी नावनोंदणी करू शकतो. एका व्यक्तिला आधारसाठी केवळ एकदाच नावनोंदणी करावी लागते. आणि आधार मिळवले जाते. दरम्यान, कधी तुमचं आधार (Aadhaar Card) बनावट तयार करुन दिलं जातं. त्यामध्ये फसवणुकीचे प्रकार घडताहेत. हे ओळखण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत.

महत्वाचे म्हणजे जर तुम्ही आधारकार्ड (Aadhaar Card) प्लॅस्टिकचे ड्युप्लिकेट तयार करून घेतले असेल तर त्याचा कोड स्कॅन (Code Scan) होत नाही. त्यामुळे ती काळजी घेणे देखील आवश्यक असते. आता आधार ई – केंद्रावर (Aadhaar E-center) आपल्याला आधारकार्ड अगदी सहज उपलब्ध होते. त्याचबरोबर त्यामध्ये आवश्यक असणारे बदल देखील करता येतात. दरम्यान, आधारकार्ड बोगस आहे का नाही ? याबाबत जाणून घेण्यासाठी काही टिप्स आहेत ते पाहा.

– पहिल्यांदा UIDAI च्या वेबसाईटला भेट द्या.

तिथे Aadhaar Services वर क्लीक करा आणि Verify an Aadhaar Number हा पर्याय निवडा.

तुम्हाला आधार कार्डवरचा तिथे नंबर अपलोड करायचा आहे.

तुम्हाला कॅप्चर कोड येईल. तो कोड अपलोड करा.

Verify Aadhaar बटणावर क्लीक करा. तिथे तुम्हाला तुमची माहिती येईल.

मोबाईल क्रमांकाचे शेवटचे 3 डिजीट येतील.

तुमच्या आधार कार्डवर एक QR कोड आहे.

यासाठी तुम्हाला QR कोड स्कॅनरची गरज लागेल.

हे अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यानंतर तो कोड तुम्ही स्कॅन करू शकता.

जर तो कोड स्कॅन झाला नाही तर आधारकार्ड बनावट आहे.

Web Title :- Aadhaar Card | how to find aadhaar card given to you is fake or not fact check

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार निलेश उर्फ पिन्या साळवे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 81 वी कारवाई

Maharashtra Govt Job Vacant Seats | राज्यात तब्बल दोन लाख 44 हजार सरकारी पदे रिक्त; माहिती अधिकारातून आकडेवारी समोर

Pune Crime | बनावट कागदपत्राद्वारे बँकेची 98 लाखांची फसवणूक ! पुण्यातील वकिलासह दोघांवर गुन्हा दाखल

Related Posts