IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : ‘गर्दी जमवणाऱ्या ‘गबरू’वर काईवाई नाही, महाराष्ट्र हळहळला, परंतु CM उद्धव ठाकरे बोलले नाहीत’ ?

by sikandershaikh
pooja-chavan-sanjay-rathod

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) नंतर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. पूजा चव्हाण हिनं मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आत्महत्याचा आरोप भाजप करत आहे. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचं नाव घेत हल्ला चढवत आहे. अशात आता संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर नुकतीच पत्रकार परिषद घेत यावर 15 दिवसांनी भाष्य केलं आहे. आपलं मौन सोडत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी गडावर हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावरून आता भाजप (Bharatiya Janata Party- BJP) नं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) वर निशाणा साधला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. आशिष शेलार म्हणाले, कोरोना काळात गर्दी केली म्हणून 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करू, पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरूवर काईवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला. महाराष्ट्र हळहळला. परंतु उद्धव ठाकरे बोलले नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं तो मी नव्हेच हे सुरू आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. (Pooja Chavan Suicide Case)

आशिष शेलार यांनी ट्विट करत याबाबत वक्तव्य केलं आहे.
शेलारांनी केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे.

दरम्यान संजय राठोड मंगळवारी दुपारी 1 वाजता पोहरा देवी दर्शनासाठी आल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी तिथं गर्दी केली होती.
कोरोनाचा विचार करता ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
काही कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली.

प्रसिद्ध पंजाबी गायक सरदूल सिकंदर यांचे निधन; किडनी ट्रान्सप्लांटनंतर कोरोना

Related Posts