IMPIMP

अंबानी प्रकरण : कारमालकाचा मृतदेह आढळल्यानंतर फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘हात बांधून कुणी आत्महत्या करू शकत नाही’

by nagesh
bjp devendra fadanvis home minister anil deshmukh mansukh hiren dead body mukesh ambani

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक कळवा खाडीत मृतावस्थेत सापडला आहे. हिरेन मनसुख असं त्यांचं नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. हिरेन मनसुख यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात वर्तवला आहे. दरम्यान यावरून आता विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचं दिसत आहे. भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मी मृतदेहाचे फोटो पाहिलेत हात बांधून कुणी आत्महत्या करू शकत नाही असं ते म्हणाले आहेत. bjp devendra fadanvis home minister anil deshmukh mansukh hiren dead body mukesh ambani

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेन यांनी आपल्या जबाबात गाडी घरगुती वापरासाठी विकत घेतल्याचं म्हटलं आहे. गाडीचं स्टेअरींग जाम झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मग क्रॉफर्ड मार्केटला जाऊन ते कोणाला भेटले हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

पुढं बोलताना फडणवीस म्हणाले, घटनास्थळी सर्वात आधी पोहोचणारे सचिन वाझे यांना ओळखत होते का. इतके योगायोग कसे काय. याची उत्तरं दिली पाहिजेत. मी मृतदेह पाहिलेला असून हात बांधलेले आहेत. हात मागे बांधून आत्महत्या करता येत नाही असं म्हणत फडणवीसांनी यावर आक्षेप घेतला.

यानंतर अनिल देशमुख म्हणाले, ही गाडी मनसुख हिरेन यांच्या मालकीची नव्हती.
ती इंटिरियरसाठी त्यांच्याकडे आली होती. तसंच हात बांधण्यात आले नव्हते.
महारष्ट्र, मुंबई पोलीस तपास करण्यासाठी सक्षम आहेत असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी फडणवीसांनी पोलीस आणि गृहमंत्री यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचा आरोप केला. हे कुणाला वाचवण्यासाठी सुरू आहे असा सवालही त्यांनी केला.

यानंतर अनिल देशमुख यांनी फडणवीसांना त्यांच्याकडे असणारी सर्व माहिती आपल्याला द्यावी अशी विनंती केली.
पुढं बोलताना त्यांनी सचिन वाझे यांनी तुमच्या अर्णब गोस्वामीला आत टाकलं म्हणून तुमचा राग आहे
का त्यांच्यावर असा सवाल केला.
यावरून विरोधकांनी गदारोळ केला.

Pune News : हेमंत रासने यांची स्थायी समिती अध्यक्षपदी सलग तिसर्‍यांदा निवड; ‘महाविकास’चे नगरसेवक बंडू गायकवाड यांचा केला पराभव

Related Posts