IMPIMP

Corona Vaccine | Johnson & Johnson च्या सिंगल डोस लशीला भारतात मंजुरी, केंद्रीय आरोग्यमंत्र्याची माहिती

by nagesh
Corona Vaccine | johnson and johnsons single dose covid 19 vaccine is given approval for emergency use in india tweets union health minister mansukh mandaviya

मुंबई (Mumbai): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Corona Vaccine | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही लसीला (Corona Vaccine) परवानगी दिली आहे. देशात लसीकरणाला गती मिळावी यासाठी लस कंपनीला पुरवठा वाढवा अशा सूचना देखील सरकारने दिल्या आहेत. मात्र, आता देशाला बळ मिळणारी आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मोदी सरकारने (Modi government) लसीबाबत आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson And Johnson Single Dose) सिंगल डोस लशीच्या आपात्कालीन वापरासाठी भारताकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता भारतीयांना ही लस (Vaccine) मिळणार आहे. याबाबत माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

देशात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी अधिक लस (Vaccine) उपलब्ध व्हावी यासाठी सरकारचा प्रयत्न सुरु आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी वापरण्यात या लशीचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. भारतामध्ये मंजुरी देण्यात आलेलं हे पाचवी लस आहे. संपूर्ण जगात लसीच्या साहाय्याने कोरोनाविरोधातील ही लढाई लढली जात आहे. भारतात 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या आतापर्यंत 49.53 कोटीपेक्षा अधिकांचं लसीकरण झालं आहे.

 

 

भारताच्या व्हॅक्सिन बास्केटचा विस्तार होत आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson And Johnson Single Dose Vaccine) सिंगल डोस लशीला देशात आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
भारताकडे आता पाच EUA लस आहेत. म्हणून देशाच्या कोरोनाविरोधातील सामुहिक लढ्याला चालना मिळणार आहे.
‘भारतामध्ये सध्या कोव्हिशील्ड (Covisheild), कोव्हॅक्सिन (Covaxin), रशियन व्हॅक्सिन स्पूटनिक (Sputnic-V) व्ही, मॉडर्ना (Moderna) च्या साहाय्याने लसीकरणाचे अभियान सुरू आहे.
अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
या दरम्यान, सध्या वापरात असलेल्या लसीचा नागरिकांना दोन डोस घ्यावे लागते.
मात्र, आताच्या नव्या येणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनचा सिंगल डोसला मान्यता मिळावी आहे.

 

 

Web Title :- Corona Vaccine | johnson and johnsons single dose covid 19 vaccine is given approval for emergency use in india tweets union health minister mansukh mandaviya

 

हे देखील वाचा :

LPG Gas Leak at Kasturba Hospital | कस्तुरबा रुग्णालयात LPG गॅस गळती, 58 रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले

HDFC Bank Alert | अलर्ट ! एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना; आजपासून रविवार रात्रीपर्यंत बँकेच्या ‘या’ सेवा बंद राहणार

Tokyo Olympics 2020 | भारत आणि पाकिस्तानमध्ये सुवर्ण पदकासाठी होणार आज ‘झुंज’

High Court | वडिलांचेच नव्हे, आईचेही आडनाव वापरू शकतात मुले : दिल्ली उच्च न्यायालय

 

 

Related Posts