IMPIMP

High Court | वडिलांचेच नव्हे, आईचेही आडनाव वापरू शकतात मुले : दिल्ली उच्च न्यायालय

by nagesh
Molestation Case | court acquitted in molestation case accused can take damages from woman said delhi high court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था High Court | दिल्ली हायकोर्ट (Delhi High Court) ने शुक्रवारी म्हटले की, वडिलांकडे आपल्या मुलीसाठी अटी ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही. प्रत्येक मुलाला आपल्या आईचे आडनाव वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे (Every child has the right to use his mother’s surname). न्यायालयाने ही टिप्पणी त्यावेळी केली जेव्हा एका अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याचिका दाखल केली, ज्यामध्ये अधिकार्‍यांना असे निर्देश देण्याची मागणी केली होती की, कागदपत्रांमध्ये त्यांच्या मुलीचे आडनाव म्हणून त्यांचे आडनाव दर्शवले जावे, आईचे आडनाव नव्हे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आईचे आडनाव वापरू शकतात मुले


मात्र, जस्टिस रेखा पल्ली यांनी याबाबत नकार दिला आणि म्हटले की, एका पतीकडे मुलीला हे फरमान सुनावण्याचा अधिकार नाही की, केवळ त्याच्याच आडनावाचा वापर करावा. जर अल्पवयीन मुलगी आपल्या सध्याच्या आडनावाबाबत आनंदी असेल तर यात काय समस्या आहे?

 

कोर्टाने म्हटले की, प्रत्येक मुला-मुलीकडे हा अधिकार आहे की, त्यांची इच्छा असेल तर ते आपल्या आईचे आडनाव वापरू शकतात. सुनावणी दरम्यान, याचिकाकर्त्याच्या वकीलांनी म्हटले की, त्यांची मुलगी अल्पवयीन आहे आणि अशाप्रकारचे मुद्दे स्वता ठरवू शकत नाही.

 

 

कोर्टाने फेटाळली याचिका


याचिकाकर्त्याच्या वकीलांनी पुढे म्हटले की, मुलीचे आडनाव त्याच्या दुसर्‍या पत्नीकडून बदलण्यात आले होते.
त्यांनी दावा केला की, नावातील बदलामुळे विमा कंपनीकडून विमा सेवेचा लाभ घेण्यात अडचणी येऊ येतील,
कारण पॉलिसी मुलीच्या नावावर तिच्या वडिलांच्या नावासह घेण्यात आली होती.
यालयाने हे म्हणत याचिका फेटाळली की त्या व्यक्तीला आपल्या मुलीच्या शाळेत जाऊन पिता म्हणून आपले नाव दर्शवण्याचे स्वातंत्र्य आहे.

 

 

Web Title :- High Court | child has the right to use his mothers surname delhi high court

 

हे देखील वाचा :

Earphone Burst | जुन्या गॅझेट्सचा वापर करत असाल तर रहा सावध, गाणे ऐकताना कानात फुटला ईयरफोन, तरूणाचा मृत्यू

Aspergillus | रिकव्हर झालेल्या कोरोना रूग्णांच्या ‘ब्रेन’मध्ये आढळली भयानक ‘व्हाईट फंगस’ची गाठ, शास्त्रज्ञ झाले हैराण

High Court | पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे वैवाहिक बलात्कार, घटस्फोटासाठी हे ठोस कारण – उच्च न्यायालय

Pune Crime | शिक्षकेच्या पती अन् त्याच्या मैत्रिणीकडून फेसबुकवर अश्लील व घाणेरडया पोस्ट, महिलेनं उचललं मोठं पाऊल

 

Related Posts