IMPIMP

EC On EVM Machine | EVM कोणत्याही OTP ने होत नाही अनलॉक, ना कोणत्याही डिव्हाईसशी कनेक्ट, हॅकिंगचे आरोप EC ने फेटाळले

by sachinsitapure

मुंबई : EC On EVM Machine | मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Eknath Shinde) खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या नातेवाईकाविरूद्ध प्रकरण दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आमने-सामने आले आहेत. आता विरोधी पक्षाच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले आणि म्हटले की ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही.

रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी म्हटले की, आज जी बातमी आली तिच्यावरून काही लोकांनी ट्विट केले. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी कोणताही ओटीपी लागत नाही. ईव्हीएम डिव्हाईस कशाशीही कनेक्ट नसतो, वृत्तपत्राने पुर्णपणे चुकीची बातमी दिली आहे. ईव्हीएम स्टँडअलोन सिस्टम आहे. बातमी पूर्णपणे चुकीची आहे, आम्ही वृत्तपत्राला नोटीस पाठवत आहोत. IPC व ४९९ अंतर्गत मानहानीची केस सुद्धा केली जाईल.

त्यांनी पुढे म्हटले की, मी पेपरच्या रिपोर्टरला समजावण्याचा प्रयत्न केला होता. आयपीसी कलम ५०५ आणि ४९९ अंतर्गत त्यांना नोटीस पाठवू. गौरवला जो मोबाईल ठेवण्याची परवानगी दिली होती तो त्याचा स्वताचा होता. पोलिसांच्या चौकशीनंतर आम्ही अंतर्गत चौकशी करू अथवा नाही हे नंतर ठरवले जाईल.

रिटर्निंग ऑफिसरने असेही म्हटले की, आम्ही कोर्टाच्या ऑर्डरशिवाय सीसीटीव्ही फुटेज कोणालाही देऊ शकत नाही, पोलिसांना सुद्धा नाही. ईव्हीएम कोणत्याही प्रोग्रामसाठी नाही आणि ते हॅक देखील होऊ शकत नाही. या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
मुंबई पोलिसांनी रविवारी शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांचा मेव्हण्याविरूद्ध एफआईआर दाखल केला आहे. पोलिसांना हा एफआयआर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी गोरेगाव मतदान केंद्राच्या आतमध्ये बंदी असताना मोबाईलचा वापर केल्याच्या आरोपाखाली नोंदवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी मंगेश पांडिलकरला मोबाईल देण्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने एका कर्मचाèयाविरोधात सुद्धा प्रकरण दाखल केले आहे.

या प्रकरणाबाबत उत्तर पश्चिम जागेवर लढलेल्या अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या, ज्या आधारे प्रकरण नोंदवण्यात आले. उत्तर पश्चिम जागेवर रविंद्र वायकर फेर मतमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले होते, ज्यावरून मतमोजणीच्या वेळीसुद्धा मोठा वाद झाला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे अधिकारी गौरव यांच्याकडे मोबाईल फोन होता जो मतमोजणी दरम्यान ओटीपी जनरेट करतो. हा फोन पांडिलकर वापरत होता. पोलिसांना संशय आहे की फोनचा वापर सकाळपासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत करण्यात आला आहे. याच दरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू होती. ईसीआयकडे सुद्धा सर्व सीसीटीव्ही फुटेज आहे जे आता मुंबई पोलिसांकडे देण्यात आले आहे.

चौकशीसाठी तीन पथके
प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी तीन पथके बनवली आहेत. आजपासून पोलीस निवडणूक आयोगाने दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतील, जी चौकशीत महत्वाची भूमिका बजावतील. सर्वात महत्वाची बाब ही आहे की, पोलीस या प्रकरणातील फोनचे सीडीआर घेत आहे आणि मोबाइल नंबरची सर्व माहिती घेत आहेत.

पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की, कॉल कोणाला करण्यात आले आणि किती ओटीपी प्राप्त झाले. पोलिसांना हे सुद्धा तपासायचे आहे की, त्या फोनवर कॉल आले की नाही. नियमानुसार, ओटीपी जनरेट झाल्यानंतर फोन आरओ (रिटर्निंग ऑफिसर) ला पोलिसांना द्यावा लागेल, जो हा तपास करेल की फोन परत का घेतला गेला नाही.

Related Posts