IMPIMP

ठाणे महापालिकेचा आरोग्य अधिकारी 5 लाखाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

by pranjalishirish
health officer arrest by ACB in bribe case in thane

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन – वेंटिलेटर निविदा मंजुरीसाठी 5 लाखाची लाच घेताना ठाणे महापालिकेचा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 15 लाखाची लाच मागून त्याचा पहिला 5 लाखांचा हप्ता घेताना एसीबीने ACB  ही कारवाई केली. कोरोना संकटाचा फायदा घेत लाचखोरीने स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या या अधिका-या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

याबाबतची माहिती अशी की, ठाणे महापालिकेला 30 वेंटिलेटर पुरवण्याची निविदा मंजूर करून देतो असे डॉ. मुरुडकर याने नवी मुंबईतील इमिनो शॉपचा मालक शिवम भल्ला यांना सांगितले. एकूण निविदा रकमेच्या 10 टक्के रक्कम म्हणजेच 15 लाख रुपये मुरुडकर याने भल्ला यांच्याकडून लाच म्हणून मागितले. त्यातील पहिला 5 लाख रुपयांचा हप्ता मुरुडकर याने तातडीने मागितला. भल्ला यांनी याबाबत एसीबीकडे ACB  तक्रार केली होती. 5 लाखांची लाचेची रक्कम मुरुडकर याने त्याच्या ऐरोलीतील लाईफ लाईन खाजगी रुग्णालयात आणून देण्यास सांगितले होते. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. भल्ला याने लाईफलाईन रुग्णालयात मुरुडकर याला 5 लाख रुपये देताच एसीबीच्या पथकाने मुरुडकर याला रंगेहाथ पकडले.

Read More : 

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Related Posts