IMPIMP

Maharashtra Monsoon Session | राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा होणार असल्याची शक्यता

by sachinsitapure

मुंबई : Maharashtra Monsoon Session | आजपासून विधानसभेचे अधिवेशन सुरु झालेले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै दरम्यान होणार आहे. मुंबईत २७ जून ते १२ जुलै या कालावधीत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी महायुती सरकार २८ जून रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

फेब्रुवारीमध्ये जेव्हा महायुती सरकारने राज्याचा पहिला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला तेव्हा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला नव्हता. हा अहवाल आज सादर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे त्यामुळे सरकारला दुसऱ्यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्या जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सगळे डोळे लावून बसले आहेत.

Related Posts