IMPIMP

Mumbai Crime | अवघ्या 6 वर्षाच्या चिमुरडीसोबत डिलिव्हरी बॉयचं विकृत कृत्य; मुंबईतील संतापजनक घटना

by nagesh
Hyderabad Gang Rape Case | aimim mlas minor son involved in Hyderabad gang rape case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mumbai Crime | मागच्या महिन्यात मुंबईच्या साकीनाका परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. त्या परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची घृणास्पद हत्या करण्यात आली. यामुळे पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली. यांनतर आणखी एक बलात्काराची (rape) धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या चारकोप (Mumbai Crime) परिसरात एका 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत डिलिव्हरी बॉयनं अमानुष (delivery boy) कृत्य केलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी की, आरोपी डिलिव्हरी बॉय (delivery boy) चारकोप पोलीस ठाण्याच्या (Charkop police station) हद्दीतील एका इमारतीत पार्सल देण्यासाठी गेला होता.
यावेळी याठिकाणी 6 वर्षीय पीडित मुलगी उभी होती. आरोपीनं तिला तिचा पत्ता विचारला आणि तिने सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन गेला.
याठिकाणी कोण पाहत नसल्याची संधी साधत आरोपीनं पीडितेसोबत बळजबरीनं अत्याचार केला. यानंतर नराधम डिलिवरी बाॅय फरार झाला.

यानंतर पिडित मुलगी वेदनेने रडत घरी गेली. घरच्यांना तिने सर्व प्रकार सांगितला. यानंतर पिडित मुलीच्या आई-वडिलांनी चारकोप पोलीस ठाण्यात (Charkop police station) धाव घेतली.
आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं बलात्कारसह पोक्सो कलमाअंतर्गत डिलिव्हरी बॉयवर गुन्हा (Mumbai Crime) दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला कोर्टात हजर केले.
त्यानंतर कोर्टाने आरोपीला 2 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस (police) करीत आहेत.

 

Web Title : Mumbai Crime | delivery boy raped 6 years minor girl in mumbai

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 107 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Earn Money | 25 हजार गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 3 लाख रुपयांची कमाई; सरकार देईल 50% मदत

 

Related Posts