IMPIMP

Ravindra Dhangekar On Pune Drugs Party | ‘ड्रग्समध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो’; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धंगेकरांचा हल्लाबोल

by sachinsitapure

मुंबई: Ravindra Dhangekar On Pune Drugs Party | मागच्या काही कालावधीपासून पुण्यात ड्रग्स बाबतच्या प्रकरणात वाढ झालेली दिसत आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, पोर्शे कार अपघातानंतर अनधिकृत पब, बार चा समोर आलेला मुद्दा, एफसी रोडवरील (FC Road Pune) ड्रग्स घेतानाचा समाजमाध्यमात व्हायरल झालेला व्हिडिओ (L3 Bar Pune) या सर्व प्रकारांमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. (Pubs In Pune)

आता या सर्व प्रकरणावरूनच राजकारण पेटले आहे. आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या बाहेर आमदार रवींद्र धंगेकर यांनी ड्रग्स प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, “अमली पदार्थ विकली जातात यात आता पंजाब नंतर पुण्याचा नंबर लागतो. आज करोडो रुपयांचा अमली पदार्थ सापडतोय याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर सरकारला जाग येते. अधिवेशनात चर्चा होईल म्हणून तात्पुरती एखाद्या हॉटेलवर कारवाई केली असा आरोप धंगेकर यांनी केला.

“आज पुण्यात पब संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसापूर्वी अल्पवयीन मुलाने दोघांना उडवले यात पोलिसांनी दोन- दोन एफआयआर फाडल्या. यात पहिल्या एफआयआरमध्ये मुलगा सुटला. दुसऱ्या एफआयआरमध्ये मुलाला ताब्यात घेतले. हा सगळा विचार करता तपास अधिकाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा होता. पण, फोजदारी गुन्हा दाखल न करता त्यांना तात्पुरते निलंबित केले आहे. सध्या चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे, असंही आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले.

पुढे धंगेकर म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अंमली पदार्थ पुण्याच्या उंबऱ्यावर आला आहे. पुण्याने मोठं मोठे राजकीय नेते दिले आहेत. लाखो विद्यार्थी पुण्यात येतात. पण, पुण्यात पब संस्कृतीमुळे पुणे बदनाम होत आहे. याचा विचार पोलिसांनी केला पाहिजे. रात्री साडेतीन वाजता हे सापडत असेल तर पोलिसांना (Pune Police) हे कळले कसे नाही, पोलिसांच्या मेहरबानीमुळे हे चालत आहे, असे धंगेकरांनी सांगितले.

Related Posts