IMPIMP

Sharad Pawar On PM Narendra Modi | शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा, मोदींना हटविल्याशिवाय हा ‘भटकता आत्मा’ स्वस्थ बसणार नाही!

by sachinsitapure

मुंबई : Sharad Pawar On PM Narendra Modi | आमच्याबद्दल बोलताना तुम्ही म्हणालात की, या महाराष्ट्रात भटकती आत्मा आहे. पण, आत्मा कधी असतो, माणूस गेल्यानंतर असतो, त्यांना चिंता पडलीय आम्हा लोकांची. भटकती आत्मा… मी एवढंच सांगतो, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीकेसीमधील Bandra Kurla Complex Ground (BKC) इंडिया आघाडीच्या (India Aghadi Sabha In Mumbai) सभेतून दिला.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या (Mahavikas Aghadi Candidate) प्रचारासाठी इंडिया आघाडीची सभा झाली. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आदी नेते उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, लोकशाही संकटात आहे, संविधान संकटात आहे, महाराष्ट्राचे हित संकटात आहे. यातून सुटका करायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्र राहावे लागेल. म्हणून, या निवडणुकीच्या प्रक्रियेतून भाजप (BJP) व मोदी या प्रवृत्तीचा पराभव करणे हे तुमचे व माझे काम आहे.

तर उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईतील ही निवडणूक प्रचाराची सभा इंडिया आघाडीच्या विजयाची नांदी ठरणारी आहे. हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, मोदी-शहा-अदानीचा होऊ देणार नाही. नाशिकच्या सभेत मोदी हिंदू-मुस्लीम भाषा करू लागले, त्यावेळी एक शेतकरी उभा राहून म्हणाला कांद्यावर बोला. त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला मोदी उत्तर देऊ शकले नाहीत.

उद्धव ठाकरे म्हणाले, हुकूमशहाची नजर कशी राक्षसी असते त्याचा अनुभव लोकांनी घेतला. या हुकूमशहाचा विषाणू पासून देशाला वाचवायचे आहे. ४ जूनला मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.

तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, नरेंद मोदींनी चारसो पारची घोषणा दिली आहे, परंतु भाजप दोनशे पारही करणार नाही, देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. खोटे बोलणे, महागाई वाढवणे, रडून सहानुभूती मिळवणे, भ्रम पसरवणे, खोटी स्वप्ने दाखवणे, काँग्रेसला शिव्याशाप देणे, कारवाईची भीती दाखवणे ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असून ते खोट्यांचे सरदार आहेत.

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ४ जूनला मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर शरद पवार, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नेते तुरुंगात जातील. मोदींचा पराभव करण्यासाठी राज्यात ४२ जागा निवडून द्या. दिल्लीकर नागरिक यांच्यासाठी मोहल्ला क्लिनिक काढत होतो. मोफत वीज देत होतो, म्हणून मला मोदींनी अटक केली.

संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकमेव पर्याय आहे. निवडणूक काळात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, मोदी यांनी शेतकऱ्याबाबत चकार शब्द उच्चारला नाही. मोदी शहा झूठों के सरदार आहेत. महाराष्ट्राची लूट करण्यासाठी राज्यातले आघाडी सरकार यांनी पाडले.

तसेच महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी म्हणाले, विदर्भात महात्मा गांधी यांच्या हत्येचा प्रयत्न होणार होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार यांनी बापूंना सावध केले होते. दुर्देवाने बापूंचे खुनी आज जिवंत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या भूमिशी आज गद्दारांचे नाव जोडले जाणे दुर्भाग्यपूर्ण आहे.

Hinjewadi Pune Crime News | पिंपरी : घरावर दगड मारल्याचा जाब विचारल्याने लोखंडी रॉडने मारहाण, बाप-लेक गजाआड

Related Posts