IMPIMP

मधुकर पिचड पडणार एकाएकी? राष्ट्रवादी खेळतोय ‘ही’ खेळी

by pranjalishirish
madhukar pichad supporter sitaram gaikar to join ncp again

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसमधून NCP बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये NCP प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आता त्यांना एकटे पाडण्याची खेळी राष्ट्रवादीकडून NCP खेळली जात आहे. त्यातच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सीताराम गायकर यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी पवारांनी मदत केली आहे.

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मधुकर पिचड आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह सीताराम गायकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार या नेत्यांनी त्यांच्यावर राग व्यक्त केला. त्यानंतरच्या काळात अजित पवार यांनी गायकर यांच्यावर राग व्यक्त करताना धोतर फेडण्याची भाषा केली होती. पण आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मदत केली आहे. त्यामुळे हा धक्का मानला जात आहे.

शरद पवारांची ऑफर

अकोले तालुक्यात शरद पवार आले असता, त्यांनी मधुकर पिचड यांच्यावर टीका करून त्यांचे स्थानिक राजकारण संपविण्याचे आवाहन लोकांना केले.
तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे.
हा कारखाना पिचड यांच्या ताब्यातून काढून घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू, अशी थेट ऑफरच पवारांनी दिली आहे.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘ताजमहालचे नाव बदलून राम महल करणार’

जळगाव महापालिकेत राजकीय भूकंप, भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला

NIA चा मोठा खुलासा ! स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणात दहशतवादी संघटनांचा संबंध नाही !

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Related Posts