IMPIMP

Maharashtra Lockdown | …तर संपुर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागतील; मंत्री विजय वडेट्टीवार

by nagesh
Corona in Maharashtra | Minister Vijay Vadettivar's big statement; "The current corona outbreak is a sign of a fourth wave," he said.

नागपुर : सरकारसत्ता ऑनलाइन   – Maharashtra Lockdown | राज्यात नुकतंच कोरोनाबाधित रुग्णसंख्या घटत असल्याची चर्चा होती. मात्र काही ठिकाणी बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर बोलताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) मोठं विधान केलं आहे. राज्यात आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Lockdown) लागतील, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. नागपूरात रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथे निर्बंध घोषीत केले जाण्याबाबच्या प्रश्नावर बोलताना राज्यातील लॉकडाऊन बाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले की, नागपूरसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याची सध्या चर्चा नाही. राज्यात निर्बंध लावले जातील अशी पुढील काही दिवसांसाठी शक्यता दिसत नाही. तिसरी लाट येणार हे अटळ आहे. सध्या तिसरी लाट उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. निर्बंध लावण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतात. मात्र, अद्याप तरी राज्यात निर्बंध कडक करणार असं सुतोवाच नाही, असे ते म्हणाले.

 

नागपुरबाबत (Nagpur) निर्बध लावले जातील असं मंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) म्हणाले होते.
यावरुन मंत्री वडेट्टीवार यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असावी. याबाबत माहित नाहीत.
माहिती घेऊन मी सांगेन. पण निर्बंध लावायचे की नाही हे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे.
निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यासाठी लागतील, असं देखील वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title : Maharashtra Lockdown | maharashtra lockdown will there be stricter restrictions state again minister vijay wadettiwar

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची सभागृह नेत्यांकडून झाडाझडती, गणेश बिडकर म्हणाले – ‘आगामी काळात शिक्षणाचे सर्व विषय शिक्षण समितीसमोर आणावेत’

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 218 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | अंदाजपत्रकाच्या 100 % अंमलबजावणीवरून स्थायी समिती Vs मनपा आयुक्त समोरासमोर ! आयुक्तांचा निषेध करत स्थायी समितीची बैठक एकमताने तहकुब – हेमंत रासने

 

Related Posts