IMPIMP

Ahmednagar News | …म्हणून 70 वर्षांच्या आजींनी थोपटली भाजप खासदार डॉ. सुजय विखेंची पाठ

by omkar
Sujay Vikhe

अहमदनगर  : सरकारसत्ता ऑनलाइन –  एका कोरोनाबाधित 70 वर्षाच्या आजीच्या उपचारासाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील Sujay Vikhe यांनी मदत केली होती. 14 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्या आजी ठणठणीत ब-या झाल्या आहेत. हॉस्पिटलमधून जाताना त्यांनी खासदार विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांची पाठ थोपटवत गोरगरीबांसाठी असेच कार्य करत रहा असा आशिर्वाद दिला. सध्या नगर शहरात Ahmednagar  या प्रसंगाची तुफान चर्चा रंगली आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांची ठाकरे सरकारकडे मागणी, म्हणाले – ‘राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले 7 हजार कोटी गरिबांना द्या’

गंगुबाई बर्डे (वय 70 रा. वरवडे, ता. राहुरी. जि. नगर Ahmednagar ) असे ह्या आजीचे नाव आहे.

गंगुबाई बर्डे यांना कोरोनाची बाधा झाली होती.
मुळा धरणाच्या दुर्गम भागात आदिवासी वस्तीवर त्या राहतात.
लक्षणे दिसल्यावर त्यांचा मुलगा अकुंश बर्डे यांनी तपासणी करून घेतली.
त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगून तातडीने व्हेंटीलेटर सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले होते.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी बेडची स्थिती आजच्याप्रमाणे नव्हती.
त्यामुळे त्यांना शोधाशोध करावी लागली. बर्डे यांनी थेट खासदार डॉ. विखेंना गाठले.
आपल्या आईची परिस्थिती त्यांना सांगितली.

 त्यावेळी विखे एका बैठकीत होते.

तातडीची गरज लक्षात घेऊन त्यानी यात लक्ष घातले.
बर्डेंना डॉ. विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले.
हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आजी ठणठणीत बऱ्या झाल्या.
हॉस्पिटलमधून जाताना त्यांनी पुन्हा खासदार विखे यांची भेट घेतली. आनंदाने आजीबाईंनी विखेंना मिठी मारली. जवळ घेत फोटोही काढून घेतला. गोरगरिबांसाठी असेच कार्य करत राहा, असा आशीर्वाद देत आजीबाई आपले पुढील आयुष्य जगण्यासाठी घरी परतल्या. या कोविड सेंटरमधून असे अनेक रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहेत. मात्र, या आजींच्या धाडसाचे कौतूक होत आहे.

Also Read:- 

12 वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाबाबतचा निर्णय तातडीने घेऊ : मंत्री उदय सामंत

खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

  COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण? रिसर्चमध्ये समोर आली बाब

  नोकरदारांसाठी मोठी बातमी ! लवकरच पगारातील PF कपात वाढणार, जाणून घ्या काय आहे सरकारचा प्लॅन

Web Title : Ahmednagar News | … therefore 70-year-old grandmother appreciated BJP MP Dr. Sujay Vikhe

Related Posts