IMPIMP

अजित पवारांचा विरोधकांना टोला, म्हणाले -‘आमचे सरकार पडेल ही विरोधकांची पहिल्या दिवसापासूनची इच्छा, पण…’

by pranjalishirish
Ajit Pawar lashed out at the opposition, saying, "The opposition wants our government to fall from day one, but ..."

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज (गुरुवार) महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्याने ही भेट होऊ शकणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  यांनी सांगितले. तसेच पहिल्या दिवसापासून विरोधकांना आमचे सरकार पडले पाहिजे अशी इच्छा होती. पण आम्ही पूर्ण बहुमतात असून सरकारला कोणताही धोका नसल्याचे सांगत अजित पवार Ajit Pawar यांनी विरोधकांना टोला लगावला.

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

अजित पवार Ajit Pawar  म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे वेळ मागितली होती. तिन्ही पक्षांचे प्रमुख राज्यपालांना भेटून सध्याची परिस्थिती आणि कामकाजाची माहिती दिली जाणार होती. पण ते बाहेर असल्याने भेट झाली नाही. तसेच विरोधकांनी फोन टॅपिंग मुद्यावरुन केलेल्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले, काल मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे (तत्कालीन एसीएस गृह विभाग) यांना आजपर्यंतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

वेगवेगळया विचारसरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारांबाबत इतिहास काय सांगतो ? जाणून घ्या

दरम्यान, अँटिलिया बाहेरचं स्फोटक प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचं बदलीचं प्रकरण या सर्व घडामोडींनी राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधक आक्रमकपणे महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहे. यातच काल विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यातील घडामोडींची सविस्तर माहिती राष्ट्रपतींना द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून महाविकास आघाडी सरकारवर लावण्यात आलेल्या आरोपांच्या सत्यतेची माहिती त्यांना देणार होते. मात्र, राज्यपाल देहरादून दौऱ्यावर आहेत. 28 मार्चला ते परतणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आजची भेट टळली आहे.

Also Read : 

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

मग काय कॅन्सरच्या उपचारामध्ये केमोथेरपी नाही पुर्णपणे ‘प्रभावी’, झाला धक्कादायक खुलासा

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

जाणून घ्या बीट ज्यूस पिण्याचे फायदे, विसरण्याचा आजार होईल दूर अन् इतरही फायदे

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

Related Posts