IMPIMP

Maharashtra : ‘अमित शहा खुनी है’ च्या घोषणांनी सभागृहात राडा, सत्ताधारी आणि भाजप समोरासमोर, जाणून घ्या नेमकं काय घडलं

by pranjalishirish
amit-shah-is-a-murderer-shivsena-ncp-and-bjp-clash-in-vidhanbhavan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज अधिवेशनात उमटले आहेत. या अधिवेशनात मनसुख हिरेन यांची पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी हत्या केल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली आहे. याच दरम्यान ‘अमित शहा Amit Shah खुनी है’ अशा घोषणा देण्यात आल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले आहे.

आज अधिवेशनात देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण उचलून धरत थेट सचिन वाझे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब हे बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी, ‘ज्यांच्या मृत्यू संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे ती योग्य आहे. पण सात वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांनाही अटक झाली पाहिजे’, अशी मागणी करण्यात आली.

‘मोहन डेलकर यांची सुसाइड नोट माझ्या हातात आहे, त्यात कोणाचंही नाव नाही. वाझे यांना वाचवण्याकरता डेलकरचे नाव पुढे केलं जात आहे,’ असा पलटवार फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे. फडणवीसांच्या या वक्त्यव्यानंतर सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या आमदारांनी वेलजवळ येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

यानंतर नाना पटोले म्हणाले की, ‘त्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेली गाडी कशी जाऊ शकते, त्यांना तीनस्तरीय सुरक्षा आहे. महाराष्ट्र एटीएस सगळ्यात चांगलं आहे. मोहन डेलकर विद्यमान खासदार आहेत तरी गुन्हा कसा दाखल होत नाही? हे सगळे संशयास्पद आहे,’ असा सवाल पटोले यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख निवेदन देण्यासाठी उभे राहिले असता, दोन्ही बाजूने गोंधळ करण्यात आला. त्यानंतर विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

याचदरम्यान, सभागृहात ‘अमित शहा Amit Shah खुनी है’; अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये गोंधळ सुरू झाला. या गोंधळानंतर विधानसभेचे कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आले. सभागृहातील या गोंधळामुळे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अजित पवार, देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis,अनिल देशमुख, अनिल परब उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार आणि अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले.

Also Read :

शिवसेना-राष्ट्रवादी’च्या भूमिकेवर नाना पटोले भडकले !

औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मिळाला ‘हा’ मोठा सन्मान, ‘आशिया पोस्ट फेम इंडिया’ कडून दखल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts