IMPIMP

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मिळाला ‘हा’ मोठा सन्मान, ‘आशिया पोस्ट फेम इंडिया’ कडून दखल

by pranjalishirish
amravati member of parliament navneet-rana-among-25-best-mps

नवी दिल्ली : भारतातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 25 महिलांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी आशिया पोस्ट आणि फेम इंडिया मासिककडून जाहीर झाली. यामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा Navneet Rana यांचा समावेश आहे. या सर्व्हेक्षणासाठी देशभरातील विविध भागातून सल्ला घेण्यात आला आहे. त्यानुसार ही नावे जाहीर झाली.

आशिया पोस्ट, महिला सशक्तीकरण, सामाजिक स्थिती, प्रतिष्ठा, उद्देश, प्रयत्न, फेम इंडिया मासिक या सर्व निकषांवर नामनिर्देशन पाहण्यात आले आहे. त्यामध्ये नवनीत राणा यांना स्थान देण्यात आले आहे. नवनीत राणा Navneet Rana यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्या विजयी झाल्या. त्यांच्या खासदारकीच्या कारकीर्दीला 18 महिने पूर्ण झाली आहेत. नवनीत राणा यांचा आक्रमक पवित्र्याची दखल विविध प्रसारमाध्यमं, सामाजिक माध्यमांनी घेतली. त्यामध्ये त्यांनी सक्षम खासदार म्हणून ओळख निर्माण केली आहे.

दरम्यान, 25 श्रेष्ठ खासदारामध्ये समावेश झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नवनीत राणा Navneet Rana यांनी यावर आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, हा माझा गौरव नसून, मला निवडून तमाम मतदार आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे पती आमदार रवी राणा आणि स्वाभिमानी शिलेदारांचा गौरव आहे.

कामाची घेतली दखल

नवनीत राणा Navneet Rana यांनी त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम राबवले. याची चर्चा सर्वदूर झाली आहे. या सर्व बाबींची दखल फेम इंडिया आणि आशिया पोस्टने घेतली आहे. त्यानुसार, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देशातील पहिल्या 25 श्रेष्ठ खासदारांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

Also Read :

‘शिवसेना-राष्ट्रवादी’च्या भूमिकेवर नाना पटोले भडकले !

औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट

Related Posts