IMPIMP

Amruta Fadnavis | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून अमृता फडणवीसांचा केला आक्षेपार्ह उल्लेख

by nagesh
Amruta Fadnavis | dcm devendra fadnavis wife amruta slams trollers say she only fears her mother in law

नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइननवी मुंबई (Navi Mumbai) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष (District President) अशोक गावडे
(Ashok Gawde) यांनी केलेल्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह विधान (Offensive Statement) केले आहे.
यावरुन भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे (BJP MLA Manda Mhatre) चांगल्याच भडकल्या आहेत. अशोक गावडे यांच्या विरोधात भाजप आमदार मंदा
म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. अशोक गावडे यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा
तुम्हाला नवी मुंबईत महिला फिरु देणार नाहीत, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक झाल्याच्या विरोधात वाशीतील (Vashi) छत्रपती शिवाजी महाराज चौकात
आंदोलन (Agitation) सुरु होते. यावेळी नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाले.
मात्र राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली. आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी (CM Wife) अशा पद्धतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली (Dancebar) मात्र रस्त्यावर येऊन बोलते, असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. यावेळी महिला देखील उपस्थित होत्या.

 

अशोक गावडे यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी निदर्शने करत अपशब्द वापरलेले ते शब्द तोंडातही घेऊ शकत नाही. नवी मुंबईकरांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो. महिलांना अपशब्द वापरणे हे आपल्या कोणत्या संस्कृतीत आणि संस्कारात बसते, हे त्यांनी लोकांना सांगावे. उद्या आम्ही त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात (Police Station) तक्रार (FIR) देणार आहोत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

…तर नावाची मंदा म्हात्रे नाही
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी की करु नये हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे.
परंतु आम्ही उद्या त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार आहोत आणि त्यांना नवी मुंबईत फिरु देणार नाही.
त्यांच्या तोंडाला जर काळे फासले नाही, तर मी नावाची मंदा म्हात्रे नाही, असा इशारा त्यांनी दिला.

 

Web Title :- Amruta Fadnavis | district president of navi mumbai ncp Ashok Gawde used offensive language about amruta fadnavis

 

हे देखील वाचा :

ST Worker Suicide | धक्कादायक ! 3 महिने पगार नसल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

Nutritionist Weight Loss Tips | कितीही प्रयत्न केले तरी, खाण्याशी संबंधीत ‘या’ 3 सवयी कधीही कमी होऊ देत नाहीत वजन

Ajit Pawar | ‘कुत्र्याचे लाड घरीच करा, त्याला गादीवर…’, तळजाई टेकडीवरील घाणीवरुन अजित पवारांचा पुणेकरांना टोला

 

Related Posts