IMPIMP

अँटेलिया केस : NIA ची अ‍ॅक्शन ! ‘या’ कलमान्वये पोलिस अधिकारी सचिन वाझेंविरूध्द गुन्हा, जाणून घ्या

by bali123
Mansukh Hiren Murder Case | sachin waze explains his role in mansukh hiren murder case said

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) अँटेलिया केसमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांना अटक केली आहे. एनआयएच्या अधिकार्‍यांनी 12 तासांच्या दिर्घ चौकशीनंतर 13 मार्च म्हणजे शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सचिन वाझे यांना अटक केली. यापूर्वी ठाणे येथील न्यायालयाने सचिन वाझे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता.

एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार, एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे sachin vaze यांना 12 तासांच्या दिर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली. एनआयएकडून वाझे यांच्याविरूद्ध फसवणूक, स्फोटक पदार्थांबाबत निष्काळजीपणा करणे, बनावट शिक्का बनवणे आणि धमकी देण्यासंबधी गुन्हा नोंदण्यात आला आहे.

एनआयए मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो गाडी मिळाल्याच्या प्रकरणाचा तपास करत आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2021 ची दक्षिण मुंबईतील आहे. येथेच मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटेलिया आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे. एनआयएने सांगितले की, सचिन वाझे यांना गुन्हे रजिस्टर क्रमांक 01/2021/एनआयए/एमयुएमनुसार भा.द.विं. कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि Explosive Substances Act 1908 चे कलम 4(ए)(बी)(आय) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

25 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर एक स्कॉर्पियो कार जप्त करण्यात आली होती, जिच्या आत जिलेटिन कांड्या ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास करण्यात सचिन वाझे सहभागी होते. नंतर त्यांना या केसमधून हटवण्यात आले होते आणि प्रकरणाचा तपास एनआयएने आपल्या हातात घेतला होता.

सचिन वाझे यांच्या विरूद्ध ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा सुद्धा तपास सुरू आहे. जी स्कॉर्पियो कार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडली होती, त्याचे मालक मनसुख हिरेन होते. मनसुख हिरेन 5 मार्चला मृतावस्थेत सापडले होते.

शनिवारी 11.30 वाजता सचिन वाझे दक्षिण मुंबइतील एनआयएच्या ऑफिसमध्ये पोहचले होते आणि आपला जबाब नोंदवला होता. एनआयए ऑफिसला जाण्यापूर्वी सचिन वाझे यांनी आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर एक रहस्यमय स्टेटस ठेवले होते. यामध्ये त्यांनी दावा केला होता की, त्यांना या केसमध्ये चुकीच्या पद्धतीने फसवले जात आहे. आता निरोप घेण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले होते.

शनिवारी सचिन वाझे यांचा जबाब घेताना एनआयने क्राइम ब्रँचचे एसीपी नितिन अलाकनुरे, एटीएस एसीपी श्रीपद काळे यांच्याशी संपर्क साधला होता आणि त्यांच्याकडून या केसच्या प्रगतीची माहिती घेतली होती.

सचिन वाझेंच्या अटकेनंतर भावाची प्रतिक्रिया, म्हणाले -‘ त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं’

बदलीनंतर सचिन वाझेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘क्राइम ब्रँचच्या सेवेतून मुक्त झालो’

Related Posts