IMPIMP

सचिन वाझेंच्या अटकेनंतर भावाची प्रतिक्रिया, म्हणाले -‘ त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं’

by bali123
sachin waze was tense he was implicated case first reaction given brother

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बाहेर स्कॉर्पिओ गाडीमध्ये सापडलेल्या स्फोटक प्रकरणात तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे sachin vaze यांना एनआयए (NIA) कडून अटक करण्यात आली. याप्रकरणावर सचिन वाझे sachin vaze यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव समोर येत असल्याने मी परवाच मुंबईत येऊन गेले. त्यावेळी सचिन हे तणावात होते. त्यांना अटक करुन त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आले असल्याची प्रतिक्रिया सुधर्म वाझे यांनी दिली.

सुधर्म वाझे म्हणाले, सचिन वाझे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर जे स्टेटस ठेवलं होतं, ते पाहून आम्हाला काळजी वाटली होती. मात्र, काल उशिरा रात्री अटक केल्याबाबत कुटुंबियांना कोणतीही माहिती तपास यंत्रणेकडून दिली गेली नाही. प्रसारमाध्यमातून सचिन यांना अटक झाल्याचे समजले, असेही सुधर्म वाझे यांनी सांगितले. तसेच सचिन वाझे सक्षम अधिकारी आहेत, ते तपासात सहकार्य करतील यात शंका नाही, असेही सुधर्म वाझे म्हणाले.

अंबनी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री 11.50 वाजता सचिन वाझे यांना अटक केली. तत्पूर्वी सचिन वाझे शनिवारी सकाळी 11 वाजता एनआयएच्या कार्यालयात गेले होते. त्या ठिकाणी त्यांची तब्बल 13 तास चौकशी करण्यात आली. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच इनोव्हातून आलेला चालक आणि अन्य एका व्यक्तीसह दुसऱ्या चालकाला अटक होण्याची शक्यता असून एनआयएच्या टीम रवाना झाल्या आहेत.

बदलीनंतर सचिन वाझेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘क्राइम ब्रँचच्या सेवेतून मुक्त झालो’

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Related Posts