IMPIMP

बदलीनंतर सचिन वाझेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘क्राइम ब्रँचच्या सेवेतून मुक्त झालो’

by bali123
Mansukh Hiren Murder Case | sachin waze explains his role in mansukh hiren murder case said

सरकारसत्ता ऑनलाइन – क्राइम ब्रँचच्या सेवेतून मु्क्त झालो असं म्हणत सचिन वाझे ( sachin vaze ) यांनी बदलीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) अडचणीत आल्यानंतर गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे sachin vaze  यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री पोलीस मुख्यालयातून यासंदर्भात अधिकृत पत्रकही निघालं आहे. त्यांच्या बदलीच्या वृत्ताला सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 3 दिवसांपूर्वीच सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ते विधान परिषदेत बोलत होते. यानंतर वाझेंची बदली नेमकी कोणत्या विभागात होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. विरोधकांनी हिरेन प्रकरण उचलून धरलं होतं. हिरेन यांच्या पत्नीनंही वाझेंवर खुनाचा आरोप केला होता. जर वाझेंना पदावर ठेवलं तर पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, असं विरोधक म्हणाले होते. वाझेंना पाठीशी घालण्याचं कारण काय, असा सवालही त्यांनी केली होता. यानंतर ठाकरे सरकारनं एक पाऊल मागे घेत वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्याची घोषणा केली होती.

सचिन वाझेंची ATS कडून 10 तास चौकशी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी नाव आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवादविरोधी पथका (ATS) नं तब्बल 10 तास चौकशी केली आहे. यावेळी त्यांनी एटीएसला माहिती दिली की, ते धनंजय गावडेंना ओळखत नाही. इतकंच नाही तर स्कॉर्पिओ कारशी आपला संबंध नसल्याचंही ते म्हणाले.

वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंची एकाच दिवसात दोनदा बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Related Posts