IMPIMP

पायी वारीला परवानगी द्या, अन्यथा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल; याला सरकार जबाबदार असेल, वारकरी आक्रमक

by omkar
Ashadi Vaari
पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनामुळे मागिल वर्षी आषाढी वारी होऊ शकली नाही. यंदाही वारीवर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे सर्व प्रमुख सोहळ्याच्या पादुका थेट बसमधून नेण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला होता. परंतु सर्व सोहळा प्रमुखांनी त्याला नकार देत पायी वारी करण्याची आग्रही भूमिका मांडली होती. त्यानुसार सर्व मागण्यांचा विचार करुन शासनाने गठीत केलेली समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला असल्याची माहिती मिळत आहे. त्या अहवालावर निर्णय येण्यापूर्वीच वारकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यंदाची आषाढी वारी (Ashadhi Vari) पायीच नेणार असल्याचे म्हटले आहे. वारकऱ्यांचे नेते हभप बंडातात्या कराडकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

पुन्हा एकदा राजस्थानमध्ये राजकीय भूकंप ! मागील 2 दिवसांपासून आमदारांच्या विविध बैठका सचिन पायलट यांच्या घरात सुरू

काय म्हणाले बंडातात्या ?

शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल.
त्यावेळी काही कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील.

वाद निर्माण होण्याची शक्यता

कराडकर यांनी मांडलेली ही भूमिका केवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठीची आहे.
त्यामुळे इतर सोहळ्यातील पालखी प्रमुख बंडातात्या कराडकरांच्या मागणीला पाठिंबा देणार का ? यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एकाच मार्गाने सर्व पालख्या नेल्या जाव्यात

दुसरीकडे सर्व पालखी सोहळे वेगवेगळ्या वाटेने जाणार असल्याने प्रशासनावर ताण येणार असेल तर सर्व पालख्या एकाच मार्गावरुन नेल्या जाव्यात.
असा ऐतिहासिक आणि धाडसी प्रस्ताव सोहळ्यातील मुख्य मानकरी राजा भाऊ चोपदारांनी मांडून शासना समोर आणखी एक पर्याय ठेवला आहे.
त्यामुळे आता सगळ्या प्रकरणी शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बंडातात्यांनी घेतली फडणवीसांची भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरीची आषाढी वारीसाठी (Ashadhi Vari) ‘बायो-बबल’ पद्धतीने अवलंब करीत काही निवडक वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधासह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिल्याचे फडणवीस यांनी ट्विट करुन सांगितले.

Also Read:

Narendra Modi | BJP चा मोठा निर्णय ! राज्यांतील विधानसभा निवडणुकामध्ये आता पीएम मोदींचा चेहरा वापरण बंद

Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले, जाणून घ्या आजचे नवे दर 

Petrol-Diesel Price Today : विक्रमी पातळीवर पोहचले पेट्रोल-डिझेल, मुंबईत 102 रुपये लीटरच्या जवळ, जाणून घ्या पुण्यासह इतर शहरातील दर

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

COVID-19 Vaccination | देशभरात 21 जूनपासून मोफत दिली जाणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे

अ‍ॅपवर 15 दिवसात पैसे ‘डबल’ होण्याचे आमिष दाखवून 250 कोटींची फसवणूक, 50 लाख लोकांना ‘गंडा’

 

Related Posts