IMPIMP

सरकार कधी आणि कसं पाडणार याची अजित पवारांना जाणीव, चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान

by nagesh
bjp chandrakant patil maharashtra government deputy cm ajit pawar

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant pati) यांनी निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा केला होता. त्यानंतर आता राज्यात सत्ताबदल होणार हे नक्की असून तो कसा होणार हे अजित पवारांना माहिती आहे, असं मोठं विधान पाटील यांनी केले आहे. तसेच ही निवडणूक भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

चंद्रकांत पाटील chandrakant pati म्हणाले, अजित पवार यांना राज्यात कोरोनाचं संकट भीषण झालेलं असतानाही दोनदा येऊन राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या लोकांच्या घरी जावं लागत आहे. हा त्यांचा स्वभाव नाही तो शरद पवार यांचा स्वभाव आहे. निवडणूक त्यांच्या हातून गेल्याचे हे लक्षण आहे. ज्या प्रकारे ते बोलत आहेत. त्यावरुन त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसून येत आहे. ज्यावेळी पायाखालची जमीन सरकते तेव्हा जीभेवरचा ताबा सुटतो, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. तसेच ही पोटनिवडणूक भाजपच जिंकणार हे स्पष्ट असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

सौ चुहे खाके बिल्ली हज को चली
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, अजित पवार यांना काय झालं आहे हे माहित नाही. मात्र अलिकडच्या काळात ते जोरात आहेत. हिंदीमध्ये एक म्हण आहे सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, असे म्हणत त्यांनी यावेळी अजीत पवार यांना टोला लगावला.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; तब्बल 2.5 हजार पोलिस राहणार तैनात

आता अजित पवारांवर अभ्यास करणार
मला कधी कधी आश्चर्य वाटतं, शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप अपूर्ण आहे. पण आता अजित पवारांवर मी अभ्यास करणार आहे. त्यासाठी काही प्रध्यपकांना भेटणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. अजित पवार सर्व काही करुन छातीठोकपणे कसे बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे त्यांच्यावर सिंचनाच्या केसेस, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. एवढे केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री… उद्या येणार नाही पण कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

सरकार कधी पडणार याची तुम्हाला जाणीव आहे
अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र नेहमी फिरत असते. ते आम्हाला देखील लागू पडते. माणसाने नेहमी नम्रपणे राहायला पाहिजे. नीट बोलले पाहिजे. सरकार पडणार नसेल तर इतका आकांडतांडव कशासाठी ? एखाद्याला आजार झाला नसेल तर त्यांना आजार झाला नाही म्हणत. तुम्ही ते पाडणार आहे याची जाणीव आहे. कधी आणि कसं पाडणार याची तुम्हाला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही खोटा आव आणता. जेव्हा सरकार पडेल तेव्हा सर्व टाईमटेबल माहिती होतं असं तुम्ही मान्य कराल, असे देखील चंद्रकांत पाटील chandrakant pati यांनी म्हटले आहे.

Also Read :

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

Related Posts