IMPIMP

Metro Car Shed | कांजूरमार्ग कारशेडवरून भाजपची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका, म्हणाले – ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’

by omkar
Ashish Shelar | Those who did not wipe the tears of farmers in two and a half years, are now touring, Ashish Shelar's attack on Uddhav Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – आरेतील मेट्रोचा कारशेड (Metro car shed) वादग्रस्त ठरल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (MVA Government) ने तो कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, येथेही कारशेड उभारणीवरून वाद निर्माण होताना दिसत आहे.
कांजूरमार्ग येथील जागेवरून वाद (Conflict) निर्माण झाला असून, न्यायालय सुनावणी सुरू आहे.
सुनावणी दरम्यान न्यायालयात दिलेल्या माहितीचा हवाला देत भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी.
खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगत होतो.
हळूहळू सत्य समोर येतेय. जमीन घोटाळ्यावरून आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे?
चेहरा भोळा अन् भानगडी सोळा, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

Pune news । अल्पवयीन मुलाला धमकी देत करायला लावले अनैसर्गिक कृत्य, एकाला पोलिसांकडून अटक

ट्विटमध्ये शेलार यांनी म्हटले आहे की,
मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजार भावाने 3 हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए. राजीव यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सांगितले. सरकार म्हणते आम्हाला माहिती नाही?
मग एमएमआरडीए (MMRDA) वर कुणाचा दबाव?
कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले?
अशी बेमालूमपणे बनवाबनवी? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

अहंकारी राजा अन् मनमौजी राजपुत्र म्हणत यापूर्वीही केली होती टीका

मेट्रो कारशेड (Metro car shed) आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबतचा निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला. त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र करत आहेत, असे त्याच दिवशी आम्ही म्हटलो होतो,
असे शेलार यांनी यापूर्वी बोलताना म्हटले होते.

Petrol Diesel Price Rise| एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा भाववाढ; जाणून घ्या आजचे दर

Related Posts