IMPIMP

सामनाच्या अग्रलेखावरून देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला, म्हणाले – ‘घाव वर्मी बसला’

by bali123
bjp devendra fadanvis on saamana editorial shivsena budget session

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं असून, या अधिवेशनात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरून धारेवर धरलं. यानंतर शिवसेनेने shivsena भाजपवर सामनाच्या आजच्या अग्रलेखातून टीका केली आहे. संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. राज्यात अनेक प्रश्न भेडसावत असताना त्यावर बोलायचे नाही, लोकांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे विरोधी पक्षांना कधी समजणार, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.  सामनाच्या अग्रलेखावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेने shivsena ला टोला लगावला आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही कोविड, वीज, शेती असे बरेच मुद्दे उचलले, त्यांना मात्र हे जनहिताचे मुद्दे दिसले नाही. त्यांना फक्त टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. पण आजच्या सामनाच्या अग्रलेखामुळे कळले की घाव वर्मी बसला, अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले आहे, पण या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.

आज सकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले. ते म्हणाले, अधिवेशनात काहीच फलित नाही. सगळ्यात महत्त्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच सामनाच्या अग्रलेखावर त्यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.

राज्यात कोरोना वाढत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी कोरोना वाढतो, अधिवेशन सुरू असताना कमी होतो आणि अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा कोरोना वाढतो, याचाच अर्थ सरकारला फक्त अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना दिसतो. इतर वेळी हा कोरोना सरकारला दिसत नाही. सध्या परिस्थिती गंभीर असून, यावर प्रभावी योजना राबवताना दिसून येत नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले. तसेच हे सरकार शेतकरी विरोधी, गरीब विरोधी आहे हे स्पष्ट झाल्याची टीका फडणवीस यांनी केली.

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

Related Posts