IMPIMP

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

by pranjalishirish
bjp-Devendra Fadnavis-chandrakant-patil-meets-rss-mohan-bhagwat-in-nagpur

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी नागपुरात दाखल होताच सकाळी विमानतळावरून संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis , चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. या बैठकीची माहिती गुप्तपणे ठेवण्यात आली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अजून समजू शकले नाही. परंतु, मराठा आरक्षणावर त्यांच्यात चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

फडणवीस Devendra Fadnavis  यांनी नागपुरात दाखल झाल्यानंतर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “अधिवेशनात काहीच फलित नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली,” असे फडणवीस Devendra Fadnavis म्हटले. यावेळी फडणवीसांना सामना मध्ये करण्यात आलेल्या टिकेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा फडणवीस म्हणाले,  “जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.अशी प्रतिक्रिया दिली.

तसेच फडणवीस पुढे म्हणाले, “कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी सरकारकडून कोणतीच व्यवस्था करण्यात आली नाही. जेव्हा अधिवेशन असते त्याच्या अगोदर कोरोना वाढतो, सुरु असताना कमी होतो आणि संपल्यानंतर पुन्हा वाढतो. हा काय राजकीय कोरोना आहे. सरकारला फक्त अधिवेशन टाळण्यासाठी हा कोरोना दिसतो. इतर वेळी दिसत नाही. परिस्थिती भयावह आहे पण सरकार प्रभावी योजना राबवताना दिसत नाही,” असे म्हणाले. “हे सरकार शेतकरीविरोधी आहे, गरीबविरोधी आहे हे स्पष्ट झालं आहे,”  अशी टीका देखील फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात तीन महिन्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला आहे त्याबाबत फडणवीस यांनी विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला त्याबद्दल सुधीरभाऊच सांगू शकतील असे फडणवीस म्हणाले.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

Related Posts