IMPIMP

‘भाषणात म्हणायचं हिंदुत्व कायम आहेच, निभवायची वेळ आली की…’ : भाजप

by nagesh
uddhav thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. अनेक प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी विरोधकांना टोलेही लगावले. हिंदुत्व कायम असल्याचं सांगत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपवर टीका केली होती. याला आता भाजपनं प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.

‘भाषणात म्हणतात हिंदुत्व कायम, निभवायची वेळ आली की टीका करतात’


भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत सीएम ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्व कायम आहेच असं भाषणात म्हणतात मात्र ते निभवायची वेळ आली की, राम मंदिर समर्पण निधीवर टीका करतात. सावरकरांना आदरांजली वाहणं दूर राहिलं. सत्तेसाठी सावरकरांवर गलिच्छा आरोप करणाऱ्या काँग्रेससोबत आघाडी करतात असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

‘हिंदू सडा हुआ है म्हणणाऱ्या शर्जीलला राज्यात मोकळं रान’


आणखी एका ट्विटमध्ये उपाध्ये म्हणतात, शिवसेना संभाजीनगर नामकरणाच्या केवळ गप्पा मारत आहे. कारण औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध आहे. हिंदू सडा हुआ है म्हणणाऱ्या शर्जीलला राज्यात मोकळं रान दिलं जातं. मात्र शिवजयंती साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

काय म्हणाले होते सीएम ठाकरे ?


काल (3 मार्च) राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदु्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. सीएम ठाकरे म्हणाले होते, भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तुमची तेवढी पात्रता नाही. बाबरी मशीद पाडल्यांतर सगळे येरेगबाळे पळून गेले. परंतु बाळासाहेब ठाकरे एकटे ठामपणे उभे होते. केंद्रात 6 वर्षे भाजपची सत्ता असताना राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपनं कायदा केला नाही.

पुढं बोलताना ठाकरे म्हणाले, शेवटी सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला.
त्यानंतर आता भाजप राम मंदिराच्या नावानं वर्गणी गोळा करत आहे.
मात्र या सगळ्यानंतर राम मंदिराचे शिल्पकार म्हणून भाजपलाच आपले नाव हवे आहे असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना भाजपला लगावला होता.

चुलतभावाशीच तरुणीचे अनैतिक संबंध; वडिलांनी मुलीचे डोके केले धडावेगळे

Related Posts