IMPIMP

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि…’

by pranjalishirish
BJP will not take anyones crutches now we will fight own 2024 and form government chandrakant patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात अनेक वर्षापासून भाजप-शिवसेना BJP युती होती. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घटनांमुळे महाविकास आघाडी सरकर अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात भाजप पुन्हा एकदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करुन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. परंतु आगामी काळातील सरकार स्थापनेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे.

मोठी बातमी ! अजित पवार, हसन मुश्रीफ यांना मिळाली ‘ही’ नवी खाती

भाजपचा BJP आज 41 वा वर्धापन दिन साजरा होत असून त्यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजप BJP कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या आगामी काळातील वाटचालीसंदर्भात भाष्य करत  मोठे संकेत दिले. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यातील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. तसेच 2024 मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्हाला कुणाच्याही कुबड्या नकोत, आम्ही स्वबळावर निवडणूक लढवून 2024 सरकार स्थापन करु, असा विश्वास चंद्राकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

देशमुख यांच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोर वाढला; भाजपच्या ‘या’ नेत्याची मागणी

पुढील आठवड्यात तिसरा राजीनामा
परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी पुढीठवड्यात राज्य मंत्रिमंडळातील तिसरा राजीनामा येईल, असे भाकित केले आहे. त्यामुळे संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Read More : 

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी मंजूर – राज्यमंत्री संजय बनसोडे

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

Related Posts