IMPIMP

भाजपचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, सतत मागत राहता, …यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?’

by omkar
Uddhav Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्ली दौऱ्यावर आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष घालावे, या मागणीसह इतरही काही विषयांवर बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी मुख्यमंत्र्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते.

खासदार नवनीत राणांना मोठा झटका, मुंबई HC कडून जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात

मात्र या भेटीवरून भाजप bjp आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा.
सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये ? असे भातखळकर यांनी म्हटलं आहे.

भाजप bjp आमदार भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज आलं अंगावर ढकलल केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत.
वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार.
झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये.

या ट्विटसोबत भातखळकरांनी मुख्यमंत्र्याचे (Uddhav Thackeray) एक व्यंगचित्रदेखील जोडले आहे. यावर उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई घोषित करायला हवे.
सतत केंद्राने हे नाही दिले, ते नाही दिले म्हणून नाक मुरडत असतात, असे लिहले आहे.

खरे तर मराठा समाजाला शिक्षण अऩ् नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासूनच राज्यातील भाजप bjp नेत्यांकडून ठाकरे सरकारला लक्ष करून त्यांची कोंडी करण्याचा प्रय़त्न सुरु आहे.
मराठा आरक्षण कायदा रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप प्रदेश भाजपकडून केला जात आहे.

Also Read

भाजपचे खासदार गिरीश बापट यांची ठाकरे सरकारकडे मागणी, म्हणाले – ‘राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले 7 हजार कोटी गरिबांना द्या’

12 वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाबाबतचा निर्णय तातडीने घेऊ : मंत्री उदय सामंत

खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय वार्षिक 42000 रुपये, जाणून घ्या तुम्हाला कसा मिळेल फायदा

  COVID-19 in India : देशात 63 दिवसानंतर एक लाखापेक्षा कमी कोरोना केस, एकुण मृत्यूंचा आकडा 3.5 लाखांच्या पुढे

प्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण? रिसर्चमध्ये समोर आली बाब

Related Posts