IMPIMP

नाना पटोलेंचा विरोधकांवर गंभीर आरोप, म्हणाले – ‘अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचं षडयंत्र’

by bali123
bjps conspiracy get permission helipad mukesh ambanis house says congress nana patole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मनसुख हिरेन प्रकरणी भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले असताना महाविकास आघाडी सरकारमधील नेते भाजपवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole यांनी भाजपवर घणाघाती आरोप केला आहे. उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. मात्र, त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. हेलिपॅडला परवानगी मिळावी, यासाठी भाजपने स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले nana patole यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. मात्र, त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानींच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने मोठं आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडला परवानगी मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.

ती गाडी तिथपर्यंत पोहाेचलीच कशी ?
अंबानी यांच्या घरापासून एक किमी अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहाेचलीच कशी, हा प्रश्न आहे. 2009 मध्ये अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणामध्ये ज्याचे नाव समोर आले त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता, असे पटोले यांनी यावेळी सांगितले. राज्यातील महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा होऊ नये, यासाठी भाजपने या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला, असा आरोप भाजपवर केला आहे.

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट

देवेंद्र फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना प्रश्न, म्हणाले – ‘…मग हा निर्लज्जपणा कुणाचा म्हणायचा ?’

Related Posts