IMPIMP

कॅनडातही PM मोदींचा ‘डंका’; पोस्टर लावून केलं जातंय कौतुक, त्याचं कारण…

by pranjalishirish
canada-thanking-pm-narendra-modi-providing-covid-19-vaccines-places-billboards-greater-toronto-area

ओट्टावा : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आत्तापर्यंत लाखो कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोनावरील लस आता बाजारात आली आहे. भारताची लसही प्रभावी ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  Narendra Modi यांनी कॅनडाला भारतनिर्मित कोरोनावरील लस देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, लशींचा पुरवठा झालाही. त्यावरून आता कॅनडा सरकारने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींनी Narendra Modi कोरोना काळात कॅनडासह इतर देशांना मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा केला होता. या लशीच्या पुरवठ्यावरून अनेक देशांनी आभार मानले होते. कॅनडा सरकारला लशींचा पुरवठा केल्यानंतर आता त्यांची स्तुती केली जात आहे. कॅनडातील ग्रेटर टोरंटो येथील परिसरात आभार मानणारे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच भारताने नेपाळ आणि बांगलादेशसह अनेक देशांना कोरोना लशींचा पुरवठा केला होता.

पंतप्रधान ट्रुडो यांनी केली होती विनंती

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाला कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा करण्याची विनंती भारताकडे केली होती. ट्रुडो यांच्या विनंतीनंतर पंतप्रधान मोदींनी Narendra Modi लशींचा पुरवठा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कोरोनावरील लशींचे 5 लाख डोस कॅनडाला दिले. त्यावरूनच आता पंतप्रधान मोदींची स्तुती केली जात आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts