IMPIMP

Chandrakant Patil | ‘पवारांची मुख्यमंत्री व्हायची तयारी चाललीय का ?’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar the type of backbiting is not right but sharad pawar told chandrakant patil

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आता मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आजारपणाच्या काळात शरद पवार ज्या पद्धतीने सक्रिय झालेत ते पाहता त्यांची मुख्यमंत्री व्हायची तयारी चाललेय असं वाटतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावेळी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ”मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांच्या घरातील व्यक्तीच्या नावाची चर्चा आहे. कारण मुख्यमंत्र्यांचा इतर कुणावर विश्वास नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर तर अजिबात नाही. शरद पवार ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत आहेत, त्यावरून त्यांनाच मुख्यमंत्री व्हायची घाई लागल्याचे दिसते,” असं ते म्हणाले. तसेच, प्रत्येक बाबतीत शिवसेनेला (Shiv Sena) शरद पवारांचे मार्गदर्शन घ्यावं लागत आहे. शिवसेनेत नेतृत्त्वाचा एवढा दुष्काळ यापूर्वी कधी आला नव्हता, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, पुढे बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ‘शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून गोव्यासह उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काही उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हे दोन्ही पक्ष पूर्वीच्या अनुभवावरून शहाणे होण्याऐवजी पुन्हा एकदा तोंडावर पडण्याची तयारी करत आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशात भाजप यश मिळवेल. पंजाबमध्ये आमच्यासाठी निवडणूक फार सोपी नाही.
राष्ट्रवादी पक्ष विविध राज्यांत एखादी जागा निवडून आणते, पण शिवसेना ताकद नसताना उगाचच टिमकी वाजवते, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

 

 

Web Title : Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil taunts ncp president sharad pawar upon CM post

 

हे देखील वाचा :

Skin Care In Winter | ‘ही’ गोष्ट गुलाब पाण्यात मिसळून लावा, चेहरा चमकेल; तज्ञांनी सांगितले ‘हे’ फायदे

Skin Care Tips | तरुण आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी करा, चेहरा आरशासारखा चमकेल

PM Kisan | PM किसान योजनेत मोठा बदल ! 12.44 कोटी शेतकऱ्यांवर होणार थेट परिणाम, कारण आता ही सुविधा झाली रद्द

 

Related Posts