IMPIMP

Chandrakant Patil | एकनाथ खडसेंची भाजपवर सणसणीत टीका; चंद्रकांत पाटील म्हणतात – ‘ते अजूनही आमचे नेते…’

by omkar
Chandrakant Patil

सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला टोला लगावत म्हटलं की, भाजपच्या आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला चांगलं माहीत आहे. खडसें यांच्या या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी उत्तर दिलय.
भाजपमध्ये अस्वस्थता नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील (chandrakant patil) हे पुण्यात बोलत होते.

तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एकनाथ खडसे आजही आमचे नेते आहेत.

तिकडे गेल्यानंतर तरी त्यांनी खरं बोलावं.
मागील दीड वर्षांमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली.
पंढरपूरही जिंकले. आम्ही काही अस्वस्थत नाही, असे चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी म्हटले आहे.
तसेच आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे, असे देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते खडसे ?

भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आज भाजपचे आमदार असलेल्या अनेकांना मीच पक्षात प्रवेश दिला होता. त्यांना तिकीटही मीच मिळवून दिलं होतं. म्हणून ते माझ्याशी मोकळेपणानं बोलतात. पक्षाच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करतात.
ही नाराजी वाढू नये म्हणून सरकार पडण्याची वक्तव्ये केली जात असतील. देवेंद्र फडणवीस हे आजही सत्ता स्थापन करण्यासाठी तळमळत आहेत. त्यांनी अस्वस्थतेतूनच अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली होती. चंद्रकांत पाटलांनी याआधी सरकार पाडण्याच्या दोन तारखा दिल्या होत्या.
फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. परंतु, काहीही होत नाही. उलट दिवसेंदिवस हे सरकार मजबूत होत आहे. विरोधक वाट बघत आहे आणि ते वाटच बघत राहतील. असे भाष्य एकनाथ खडसे यांनी केले होतं.

Also Read:- 

PM मोदींना सहकाऱ्यांचा विसर? गडकरींपाठोपाठ योगींनाही दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Bill and Melinda Gates | …म्हणून तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या

‘ये जवानी है दिवानी’ फेम एवलिन शर्माने बांधली ‘लग्नगाठ’ !

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

Pune Crime News : पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश

E-Pass l पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच – पुणे पोलीस

दुसर्‍यांदा पिता बनला प्रिन्स हॅरी, पत्नी मेगन मर्केलनं दिला गोंडस मुलीला जन्म, ‘लिली डायना’ ठेवलं नाव

Related Posts