IMPIMP

Pooja Chavan Suicide Case : ‘इतके भयानक योगायोग मी कधीच पाहिले नाहीत’ – चित्रा वाघ

by sikandershaikh
 Chitra Wagh On Sanjay Rathod | chitra kishor wagh says its unfortunate that pooja chavan death case accused mla sanjay rathod take oath as minister in shinde cabinet expansion

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan Suicide Case) राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. भाजपचा या प्रकरणी आधीपासूनच आक्रमक पवित्रा आहे. भाजपच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आता यवतमाळमध्ये पूजा चव्हाणचा गर्भपात करण्यात आला असा गौप्यस्फोट केला आहे. तसंच पूजाचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरची आई आजारी पडावी आणि दोन दिवसांनी अरुण राठोडच्या घरी दरोडा पडावा इतके भयानक योगायोग मी कधीच पाहिले नाहीत असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं.

काय म्हणाल्या चित्रा वाघ ?

चित्रा वाघ म्हणाल्या, पूजा चव्हाणचा गर्भपात झाला त्या दिवशी यवतमाळच्या रुग्णालयात ड्युटीवर एक डॉक्टर होते. परंतु त्यांच्या जागी त्यावेळी दुसरेच डॉक्टर आले आणि त्यांनी पूजा चव्हाणला गर्भपाताची ट्रीटमेंट दिली. दुसऱ्याच दिवशी त्यांची आई आजारी पडते आणि ते 8 दिवसांच्या रजेवर जातात. लगेच 2 दिवसांनी अरुण राठोडच्या घरावर दरोडा पडावा, चोरी व्हावी इतके भयानक योगायोग मी कधीच पाहिले नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.

पुढं बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी गर्भपातासाठी पूजा (Pooja Chavan Suicide Case) गेली अशी बातमी आहे, त्यासंदर्भात मी आज यवतमाळच्या एसपींसोबत बोलले. त्या दिवशी रुग्णालयात जे डॉक्टर होते त्यांनी पूजाला ट्रीटमेंट दिली नाही. दुसऱ्या डॉक्टरांनी येऊन पूजाला ट्रीटमेंट दिली.
मग त्या डॉक्टरची चौकशी केली का ? असा प्रश्न मी एसपींना विचारला.
त्यावर त्यांनी सांगितलं की, पुण्याची टीम इथं तपासासाठी आली होती,
त्यांनी आमच्याकडे कुठलीही विचारणा केली नाही किंवा कुठलीही मदत मागितली नाही.
त्यांची टीम आली आणि तपास करून गेली असंही एसपींनी मला सांगितलं.
पुणे पोलिसांनी एवढ्या मोठ्या घटनेबद्दल यमवतमाळच्या एसपींनादेखील सांगितलं नाही असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

चित्रा वाघ असंही म्हणाल्या, पोलीस सांगतात, आई-वडिलांची तक्रार नाही म्हणून गुन्हा दाखल होत नाही.
परंतु ज्या 12 ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या, त्याच्या चौकशीचं काय झालं.
अरुण राठोडला फोन केला होता त्याचं काय झालं. फोन संजय राठोड करत होते असा माझा आरोप आहे.

वाघ म्हणतात, आम्हाला राज्याच्या संवेदनशिल मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे,
बलात्कारी आणि खुनी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा. आता महाराष्ट्रात मंत्रीच बायकापोरींवर अन्याय करत आहेत.
ही मोगलाई नाही, शिवशाही आहे हे कृतीतून दाखवून द्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

Related Posts