IMPIMP

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या – ‘सरकार आणि पोलीस मुर्दाड असले तरी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास’ (व्हिडिओ)

by nagesh
Chitra Wagh | BJP leader chitra waghs criticism of raghunath kuchik and ask where is victim

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्यात नांदेड, बीड, पुणे, जळगाव, नाशिक या ठिकाणी महिला व मुलींवर अन्याय व अत्याचार होत आहेत. यातील अनेक घटनांमध्ये पोलीस (Police) व राजकारण्यांचे (politicians) हात बरबटले आहेत. एकंदरीतच राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे (Law and order) धिंदवडे निघाले आहेत. पोलीस यंत्रणा (Police system) सरकारच्या दावणीला बांधली आहे. सरकार व पोलीस मुर्दाड असले तरी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, आम्ही न्यायालयात जाऊ अशा शब्दांत भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray Government) हल्लाबोल केला. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

चित्रा वाघ (Chitra Wagh) पुढे म्हणाल्या, संजय राठोड (sanjay rathod) यांची हाकालपट्टी झाली मात्र कारवाई झाली नाही.
राष्ट्रवादीच्या (NCP) युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख प्रकरणात (Mehboob Shaikh case) पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही.
पारनेरच्या आमदाराने महिला तहसीलदारावर आरोप केले, धमकावले, अश्लिल शिवीगाळ केली, तरी अद्याप गुन्हा (FIR) दाखल नसल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

 

 

बलात्काऱ्यांना वाचवण्याचे काम सरकार करत आहे

 

राज्य सरकार गुन्हेगारांना अभय देत असल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढत आहे. दोन गृहराज्यमंत्री राज्यात आहेत. ते एकाही घटनेवर बोलत नाहीत.
जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे व बलात्काऱ्यांना (rapists) वाचवण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी यावेळी केला.
तसेच आरोग्य विभागाची पाच वेळा परीक्षा (health department Exam) घ्यावी लागली, एमपीएससीचा (MPSC) बट्ट्याबोळ झाला आहे.
सरकारकडून लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम सुरु असल्याचे वाघ यांनी म्हटले.

 

शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट केले का?

 

राज्यातील रुग्णालयांना आग लागल्यावर तेथील डॉक्टर व नर्सेसवर कारवाई झाली.
मात्र राज्याचे आरोग्यमंत्री जाग्यावर आहेत. भंडाऱ्याच्या अग्नी कांडानंतर राज्यातील किती शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट (Fire audit) केले हे सरकारने जाहीर करावे, असे वाघ यांनी म्हटले.

 

लोकांना फसवणारे मिस्टर नटवरलाल

 

सराकरची दोन वर्षे म्हणजे लोकांना फसवणारे मिस्टर नटवरलाल (Mr. Natwarlal) आहे.
लोकांना फसवणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो.
भाजपचे दोन्ही सभागृहातील नेते फाडून खातील म्हणून अधिवेशन पुढे ढकलले जात आहे.
आम्ही गंभीर, आमचे सरकार खंबीर, या शिवाय दुसरे काहीच सरकारमधील लोकांना बोलता येत नाही.
महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर जे घडले नाही, ते आता घडत आहे. हे वसुली सरकार आहे.
परमबीर सिंह (Parambir Singh) तुमच्या सेवेत होता तेव्हा का नाही कारवाई केली.
काही करता येत नसेल तर केंद्राकडे बोट केले जाते, असा घणाघात वाघ यांनी केला.

 

महिला अ‍ॅट्रॉसिटी कायदा करा

 

मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ज्या प्रमाणे अ‍ॅट्रॉसिटी कायदा (Atrocities Act) आहे.
त्याच धरतीवर महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी महिला अ‍ॅट्रॉसिटी कायदा करावा.
महिला व मुलींच्या अन्याय अत्याचाराच्या खटल्यासाठी स्वतंत्र न्यायालय असावे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जामीन मिळू नये, यासाठी कायद्यात तरतूद करावी अशी मागणी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली.

 

Web Title : Chitra Wagh | bjp leader chitra wagh criticize thackeray government over rape cases as wll as law and order in pune press meet

 

हे देखील वाचा :

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना ! महिन्याच्या किमान गुंतवणूकीत मिळतील तब्बल 35 लाख रुपये; जाणून घ्या

International Civil Aviation | परदेशात जाणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर ! डिसेंबर अखेर पर्यंत सामान्य होईल आंतरराष्ट्रीय विमानसेवा

DGP Sanjay Pandey | संजय पांडे पोलीस महासंचालक पदासाठी अपात्र? राज्याला नवीन DGP मिळण्याची शक्यता

 

Related Posts