IMPIMP

chitra wagh | ‘तुझा नवरा अडकणार नाही असं त्यावेळी पवार साहेब म्हणाले होते’ : चित्रा वाघ

by sikandershaikh
sharad-pawar-chitra-wagh

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) मध्ये आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी पतीला मानसिक त्रास दिला जात आहे असा आरोपही केला आहे. मला यामुळे काही फकत पडत नाही मी आता गप्प बसणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर तुझा नवरा अडकणार नाही असं पवार साहेब म्हणाले होते असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे.

‘तुझा नवरा अडकणार नाही असं पवार सांहेब म्हणाले होते’

चित्रा वाघ (chitra wagh) म्हणाल्या, आज मला शरद पवार साहेबांची आठवण येतेय. होय शरद पवार माझा बापच आहे. 2017 मध्ये जेव्हा पहिली एफआयआर दाखल झाली आणि हे प्रकरण समोर आलं तेव्हा मला शरद पवारांनी बोलवून घेतलं. मी सिल्व्हर ओकवर गेले होते. शरद पवारांनी माहिती घेतली, त्यांनी सर्व प्रकरण बघितलं आहे. तुझा नवरा अडकणार नाही असं पवार साहेब म्हणाले होते असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं.

‘गुन्हा दाखल झाला हे मला आता पत्रकारांकडून कळालं’

पुढं बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक झाल्यानंतर मला धमक्यांचे फोन केले. माझे विकृत फोटो व्हायरल केले. मला फरक पडत नाही. माझ्या नवऱ्यावर बिहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. माझ्या फॅक्ट्री नाहीत. गुन्हा दाखल झाला हे मला आता पत्रकारांकडून कळालं. मला मात्र काहीही कल्पना नाही. चौकशीसाठी घरी येऊन नोटीस दिली. गुन्हा दाखल केला तेव्हा व्हॉट्सअॅपवरून कळवतात असंही वाघ यांनी सांगितलं.

‘कितीही त्रास दिला तरी तुम्हाला सगळ्यांना मी चित्रा वाघ एकटी पुरून उरणार’

चित्रा वाघ असंही म्हणाल्या, माझा नवरा तर कुठेच नव्हता.
तरीही गुन्हा दाखल केला. ज्यानं पैसे घेतले त्याची चौकशी सुरू आहे.
त्याच्यावर गुन्हा दाखल नाही. गजानन भगत हा मुख्य आरोपी त्याला का सोडलं ? असा सवालही त्यांनी केला.
2011 पासून एसीबीच्या अनेक केसेस पेडिंग आहेत.
मग एवढी तत्परता आता कशी असंही त्या म्हणाल्या.
फक्त चित्रा वाघचा नवरा आहे याची शिक्षा किशोर वाघ यांना दिली जात आहे. माझा न्यायसंस्थेवर विश्वास आहे, मुर्दाड सरकारवर नाही.
मला कितीही त्रास दिला तरी तुम्हाला सगळ्यांना मी चित्रा वाघ एकटी पुरून उरणार असंही त्यांनी नमूद केलं.

Related Posts