IMPIMP

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

by pranjalishirish
Chitra Wagh | BJP leader chitra waghs criticism of raghunath kuchik and ask where is victim

मुंबई : राज्यातील अनेक प्रकरणांवरून सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ Chitra Wagh  यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. ‘अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’, असे त्या म्हणाल्या.

‘माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता अनिल देशमुख यांचेही नाव हफ्तेखोरी प्रकरणात आले आहे. त्यानंतर देशमुख यांनीही राजीनामा दिला. या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून सातत्याने टीका केली जात आहे. चित्रा वाघही Chitra Wagh या प्रकरणावरून आक्रमक होताना दिसत आहेत. आता त्यांनी एक ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, ‘अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’. चित्रा वाघ यांनी हे ट्विट करताना नेमका कोणावर निशाणा साधला याचीच चर्चा सध्या सुरु आहे.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, दीपाली चव्हाण प्रकरण, वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांचे ‘लेटरबॉम्ब’ या सर्व प्रकरणानंतर राज्य सरकारवर विरोधकांकडून वारंवार टीका केली जात आहे. याच विरोधावरून आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. चित्रा वाघ Chitra Wagh  यांनीही हे सर्व मुद्दे लावून धरले होते. त्यानंतर आता त्यांनी अशाप्रकारे ट्विट केले आहे.

Read More : 

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Related Posts