IMPIMP

CM Thackeray and Ajit Pawar । उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग नाही आवडला’, मुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग बदलण्याचं धाडस सरकारमध्ये’

by bali123
Ajit Pawar | our mindset to go with the thackeray group in the mumbai municipal elections said ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Thackeray and Ajit Pawar | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील मल्हार पेठ पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या इमारतीचा ई-भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी इमारतीच्या रंगावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावला आहे. ‘रंग बदलण्याचं धाडस या सरकारमध्ये आहे. “अजित पवार इमारतीच्या रंगाबद्दल बोलले. मला बरं वाटलं, मला असं वाटलं होतं की, मी एकटाच कलाकार आहे. हल्ली माझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे. जे समोर दिसत. अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात, असं मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. cm uddhav thackeray ajit pawar police station construction

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कार्यक्रमा दरम्यान बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) व्हावेत, त्यांच्या हस्ते इमारतींचं उद्घाटन व्हावं आणि मला कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित राहता यावं, असंच नियतीच्या मनात असावं. त्यामुळे पोलीस ठाण्याचं काम इतकं लांबलं आहे. ‘देर आये दुरूस्त आये. चांगल्या कामाची सुरूवात होतेय ही आनंदाची बाब आहे. ही कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.


तसेच पुढे पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘ प्रेझेटेशनमध्ये इमारतीचा आणि पोलीस ठाण्याचा रंग मला आवडलेला नाही.
पिवळा पट्टा आणि निळा पट्टा. ते एकदम बेकार दिसतं.
काम पूर्ण होईल त्यावेळस चांगल्या पद्धतीने रंग त्याला देऊ.
चांगला रंग देऊन इमारत उठावदार करता येते. त्या गोष्टीचा विचार सर्वानी करावा. महाराष्ट्र पोलीस दलाला शौर्याची परंपरा आहे. पोलिसांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवली पाहिजे. वरिष्ठांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांची काळजी प्राधान्यानं घ्यायला हवी. राज्यातील पोलीस वसाहतींची अवस्था चांगली नाहीत. पण चांगली घरं देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा (State Government) असणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

Petrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे रोज नवीन विक्रम, मुंबईत 103 रुपयांवर पोहचला एक लीटरचा भाव

या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, ‘अजित पवार (Ajit Pawar) इमारतीच्या रंगाबद्दल बोलले.
मला बरं वाटलं, मला असं वाटलं होतं की, मी एकटाच कलाकार आहे. हल्ली माझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे.
जे समोर दिसत. ते बघावं लागतं. अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात.
पण, हे रंग बदलण्यासाठी धाडस असावं लागतं. ते धाडस या सरकारमध्ये आहे.
लोक रंग दाखवताहेत, ते आपण बघतो, त्याला काही अर्थ नाही.
पण, एखादा रंग नाही, आवडला, तर ते बदलण्याचं धाडस सरकारमध्ये असल्याचं मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.

Web Title :- cm uddhav thackeray ajit pawar police station construction

Related Posts