IMPIMP

ncp sharad pawar | शरद पवारांचा दिल्ली दौरा; राजकीय चर्चांना उधाण

by bali123
ncp sharad pawar delhi opposition parties lok sabha election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन गेल्या काही दिवसापासून मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (ncp sharad pawar) दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. या दिल्ली दौऱ्यात ते भाजपच्या (BJP) विरोधात असणाऱ्या पक्षांच्या नेत्याची भेट घेऊन आगामी निवडणुका (Election) आणि देशातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार २३ जूनपर्यंत दिल्लीत असतील याला राष्ट्रवादीने (NCP) दुजोरा दिला असून अन्य माहिती देण्यास नकार दिला आहे. याबाबतचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे. ncp sharad pawar delhi opposition parties lok sabha election

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी (NCP anniversary) शरद पवार (sharad pawar) यांनी भाजपासोबत हातमिळवणी करण्याच्या शक्यता फेटाळल्या होत्या. तसेच महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) पाच वर्षे टिकेल असेही स्पष्ट केले होते. त्याचबरोबर आगामी आगामी लोकसभा व विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करेल असं सूचक विधानही त्यांनी केलं होतं. दरम्यान शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यात भेट झाली होती. तीन तास या दोघांमध्ये चर्चा सुरु होती. त्यामुळे या भेटीवरून अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. त्यावेळी देशातील राजकीय परिस्थितीबाबत ही भेट झाल्याचं राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (NCP Chief Spokesperson Nawab Malik) यांनी स्पष्ट केलं होतं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

शरद पवार यांची भाजपविरोधात सशक्त पर्याय उभा करण्याची योजना असून त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे (NCP) प्रयत्न सुरू आहेत.
बिगर भाजप (BJP) पक्षांचा पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे वारंवार शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले होते.
तत्पूर्वी पश्चिम बंगाल निवडणुकी (West Bengal elections) आधीही पवारांनी तसे मतप्रदर्शन केलं होतं.
यावेळी आगामी सार्वत्रिक निवडणुकीत बिगर भाजपा पक्षांचे नेतृत्व शरद पवार हे करतील, असं राष्ट्रवादीने सूचित केलं होतं.
त्याचबरोबर प्रशांत किशोर यांच्याकडे राज्यातील राष्ट्रवादीची रणनीती ठरवण्याची जबाबदारी देण्यात येणार नसल्याचेही मलिक यांनी सांगितले होते.

राज्यातील प्रश्नांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) पहिल्यांदाच दिल्लीत जाणार आहेत. या भेटी दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची झालेली वैयक्तीक भेट यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी यात चूक काय अशी विचारणा केली होती. तर दुसरीकडे टीकाकारांना उत्तर देताना शरद पवार यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) विश्वास असल्याचे सांगितले होते.

Web Tital : –ncp sharad pawar delhi opposition parties lok sabha election

Related Posts