IMPIMP

CM उद्धव ठाकरेंची नाव न घेता राणेंवर टीका, म्हणाले- ‘तुम्ही सच्चे शिवसैनिक, काही जण फक्त स्वत:चाच विचार करतात’

by amol
uddhav thackeray-narayan rane

सरकारसत्ता ऑनलाइन – तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. कोकणासाठी तुम्ही मागणी केली. नाहीतर काही जण केवळ स्वत:साठी मागत असतात असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांनी नाव न घेताच भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचे ऑनलाइन उद्घाटन करताना ते बोलत होते.

‘योजनांचा शुभारंभ झाला आहे, त्या पूर्ण करणारच’

उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray म्हणाले, या योजना पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: उद्घाटन करण्यासाठी कोकणात येईन. अनेकदा योजनांची घोषणा केली जाते. भूमिपूजन केलं जातं. परंतु पुढं काम होत नाही. मात्र, आपल्या सरकारकडून तसं होणार नहाी. या योजनांचा शुभारंभ झाला आहे. त्या आपण पूर्ण करणार आहोत, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

‘तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात, त्यामुळंच स्वत:साठी काही मागितलं नाही’

पुढं बोलताना ठाकरे म्हणाले, तुम्ही रत्नागिरीसाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मागितलं. तुम्ही स्वत:साठी काही मागू शकला असतात. तुम्ही मात्र कोकणासाठी मागितलं याचा मला अभिमान आहे. नाहीतर काही जण केवळ स्वत:साठी मागत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळंच तुम्ही स्वत:साठी काही मागितलं नाही, असं म्हणत त्यांनी नाव न घेताच नारायण राणे यांच्यावर टीका केली.

‘मला खोटं बोलता येत नाही’

उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray असंही म्हणाले, मी आजही मेडिकल कॉलेजची घोषणा करू शकतो. मात्र, मला खोटं बोलता येत नाही. कोकणात कॉलेज करायचं हे माझ्या लक्षात आहे. हे काम करू शकतो की, नाही याची खात्री होत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला शब्द देणार नाही, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.

Related Posts