IMPIMP

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : लष्कर न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाबाबत पुणे पोलिसांची महत्त्वाची माहिती, अर्ज कोर्टाने फेटाळले

by amol
Pooja Chavan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात गाजलेल्या पूजा चव्हाण Pooja Chavan प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाण Pooja Chavan आत्महत्या प्रकरणी पुण्यातील लष्कर न्यायालयात दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज फेटाळून लावले आहेत. पूजा चव्हाण Pooja Chavan या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. मात्र, तिच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केल्या जात असून, या प्रकरणात संजय राठोड यांच्या चौकशीचीही मागणी होत होती. याच प्रकरणी लष्कर न्यायालयात काही जणांनी अर्ज दाखल केले होते.

पूजा चव्हाण Pooja Chavan आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात वकील व्ही. एन. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जस्टीस लीग सोसायटीने लष्कर न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करून घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली होती. सोसायटीशी संलग्न असलेल्या वकील भक्ती पांढरे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

तर दुसरीकडे भाजपच्या कायदा सेलनेदेखील वकील एशानी जोशी आणि शुभांगी परुळेकर यांच्या माध्यमातून अर्ज दाखल केला होता. कलम 156 (अ) अंतर्गत न्यायालयात दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. न्यायाधीश रोहिणी पाटील यांच्या पीठाने दोन्ही अर्ज फेटाळून लावले असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

बीड जिल्ह्यातील परळी या गावची असलेल्या पूजा चव्हाण Pooja Chavan या तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यात आत्महत्या केली. पूजा चव्हाण इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहात होती. तिनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याचे आरोप झाले. त्यानंतर संबंधित मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला.

Related Posts