IMPIMP

संजय राऊत यांच्याकडे पुन्हा शिवसेनेचे मुख्य प्रवक्तेपद, जाणून घ्या कारण

by pranjalishirish
cm uddhav thackeray sends message congress ncp appointing sanjay raut chief spokesperson shiv sena

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत Sanjay Raut  यांची पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्यासह दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हेही पक्षाचे मुख्य प्रवक्ते असतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवड केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना सलग दुसऱ्यांदा मुख्य प्रवक्तेपद मिळाले आहे.

बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण आम्हालाही नाही पण आम्ही Online पाहणार – अनिल परब

संजय राऊत Sanjay Raut  हे शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सरकार स्थापन होण्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोन नेत्यांना एकत्र आणण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. शरद पवार यांच्याशी त्यांचे असलेले चांगले संबंध सर्वांनाच ठाऊक आहेत. तसेच राज्यातील विविध प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात होती. पण संजय राऊत यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसला आपल्या लेखामधून सुनावले, काँग्रेसच्या नेतृत्वाला देखील कानपिचक्या दिल्या. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा त्यांनी ‘Accidental Home Minister’म्हणून उल्लेख केला होता.

लवकरच PM मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील, ‘या’ भाजप खासदाराचा पंतप्रधानांना टोला

याशिवाय, शिवसेना सरकारमध्ये आल्यानंतरही संजय राऊत हे मुखपत्रातून मित्रपक्षांना सुनावण्याचे काम करतात. याचा अर्थ शिवसेनेत राज्याच्या-पक्षाच्या कारभाराची सगळी सूत्रे उद्धव ठाकरेंकडे असली, तरी पक्षाची भूमिका आणि राजकीयदृष्ट्या पक्षाला जे साध्य करायचे आहे ते संजय राऊत यांच्या माध्यमातून मांडत राहायचे अशी व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आल्याचे दिसत आहे.

‘अनिल देशमुखांवरील ‘त्या’ 100 कोटींच्या आरोपांच्या चौकशीसाठी नेमलेली समिती म्हणजे जनतेच्या डोळयात निव्वळ धुळफेक’

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राऊत Sanjay Raut  यांच्या वक्तव्यांबद्दल आणि लिखाणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांना हटवले असते तर शिवसेना कुठेतरी दबावाखाली आली आणि राऊत यांना हटवण्यात आले, अशी चर्चा निश्चित झाली असती. तसेच संजय राऊत यांचे मुख्य प्रवक्तेपद कायम ठेवले नसते, तर एक वेगळा मेसेज गेला असता. भाजपासोबत शिवसेना सत्तेत होती, तेव्हाही शिवसेना सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत असे. ही टीका करण्यासाठीचा चेहरा संजय राऊतच होते.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts