IMPIMP

Sudhir Mungantiwar : ‘उद्धव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रिपद जावं’ !

by sikandershaikh
Sudhir Mungantiwar | bjp leader and minister sudhir mungantiwar replied shiv sena uddhav thackeray over criticism over cabinet expansion

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं दिसलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांच्या भाषणावरील चर्चेदरम्यान विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. अनेक प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी विरोधकांना टोलेही लगावले. माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या भाषणबाजीवरही त्यांनी नटसम्राट नाटकाची आठवण झाली असं म्हणत खोचक टोला लगावला. सीमा भाग, मराठी भाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, संभाजीनगर अशा मुद्द्यांवरूनही मुख्यमंत्र्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. यावर आता मुनगंटीवार यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे.

‘उद्धव ठाकरे यांचं भाषण शिवसेनाप्रमुखांसारखं होतं’

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अधिवेशनातील उद्धव ठाकरे यांचं भाषण हे शिवसेनाप्रमुखांसारखं होतं. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय प्रश्न उपस्थित केले. राज्यातील विविध प्रश्न आम्ही उपस्थित केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली नाहीत.

‘उद्धव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रिपद जावं’

पुढं बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून त्यांनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रिपद जावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो अशी इच्छा देखील सुधीर मुगंटीवार यांनी यावेली बोलताना व्यक्त केली.

काय म्हणाले होते CM ठाकरे ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याच भास झाला.
मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथेल्लो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला.
सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेग.
पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही जाणवलं अशी बोचरी टीका त्यांनी केली.

पुढं बोलताना मुख्यमंत्री (uddhav thackeray) म्हणाले, मुनगंटीवार यांच्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना भीती वाटत होती.
मी आणि मुनगंटीवार हाडाचे कलाकार आहोत.
परंतु कलेला राजकारणात वाव नाही.
मात्र मुनगंटीवार यांना संधी मिळाली की त्यांची कला उफाळून येते.
पण सुधीरभाऊ तुमच्यामधला कलाकार मारू नका.
असा खोचक सल्लाही सीएम ठाकरेंनी यावेळी बोलताना दिला.

सीरमला टाकले मागे, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस 81 % परिणामकारक !

Related Posts