IMPIMP

देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी सोडणर नाही’; CM उद्धव ठाकरे म्हणाले – ‘ मग कधी जाताय ?’

by sikandershaikh
devendra fadnavis

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी त्याला सोडणार नाही. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी फडणवीसांना (devendra fadnavis) प्रतिप्रश्न केला आहे. पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार असा सवाल सीएम ठाकरेंनी केला आहे. इतकंच नाही तर शर्जील उस्मानी ही उत्तर प्रदेशातील घाण आहे, आमच्याकडील नाही असंही ते म्हणाले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी हिंदु्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. सीएम ठाकरे म्हणाले, भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तुमची तेवढी पात्रता नाही. बाबरी मशीद पाडल्यांतर सगळे येरेगबाळे पळून गेले.
परंतु बाळासाहेब ठाकरे एकटे ठामपणे उभे होते.
केंद्रात 6 वर्षे भाजपची सत्ता असताना राम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपनं कायदा केला नाही.

पुढं बोलताना ठाकरे म्हणाले, शेवटीच सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला.
त्यानंतर आता भाजप राम मंदिराच्या नावानं वर्गणी गोळा करत आहे.
मात्र या सगळ्यानंतर राम मंदिराचे शिल्पकार म्हणून भाजपलाच आपले नाव हवे आहे असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना भाजपला लगावला.

‘शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती आहे’

माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या भाषणबाजीवरही सीएम ठाकरेंनी नटसम्राट नाटकाची आठवण झाली असं म्हणत खोचक टीकाही केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांची चर्चा ऐकून नटसम्राट पाहिल्याचा भास झाला.
मुनगंटीवारांच्या भाषणादरम्यान नटसम्राटमधील मी अथ्थेलो, मी आहे हॅम्लेट असा भास झाला.
पण शेवटी कुणी किंमत देतं का किंमत अशी स्थिती असल्याचंही जाणवलं अशी बोचरी टीका त्यांनी केली.

जेव्हा CM ठाकरे फडणवीसांना म्हणाले- ‘माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका !’

Related Posts