IMPIMP

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद; ‘हे’ माजी मुख्यमंत्री राज्यातील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज

by bali123
congress leader prithviraj chavan is angry with the state leaders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – नुकतेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले आहे. पण आता या काँग्रेस congress मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून राज्यातील काँग्रेस congress नेत्यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली आहे.

कशामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली नाराजी
पृथ्वीराज चव्हाण ‘अर्थसंकल्प अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारच्या कृषी कायदा विरोधात आहे. काँग्रेसने आधीच या कायद्याला विरोध दर्शवला आहे. राज्यात कायदा विधिमंडळात मंजूर केला जाणार होता. पण, या अधिवेशनामध्ये कृषी कायद्याबद्दल काहीच निर्णय झाला नाही’,यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक का झाली नाही माहिती नाही, पण कृषी कायदा दुरुस्तीची भूमिका आमची होती. पण काहीच झाले नाही. यावर निर्णय होणे गरजेचे होते, असेसुद्धा पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट
काही महिन्यांपूर्वी हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशानंतर त्यांना तात्काळ गुजरात काँग्रेस कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली होती, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांची चाचपणी करत आहे की काय, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने हार्दिक पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीमध्ये गुजरात राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच जातीय आरक्षण याच्यावर चर्चा झाल्याचे समजत आहे. तसेच या भेटीमध्ये मुंबईत काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेले खासदार मोहन डेलकर यांच्याविषयी चर्चा झाल्याचेसुद्धा बोलले जात आहे.

शरद पवार आणि हार्दिक पटेल यांची मुंबईत भेट! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

Related Posts