IMPIMP

शरद पवार आणि हार्दिक पटेल यांची मुंबईत भेट! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

by pranjalishirish
congress-leader-hardik-patel-meets-ncp-leader-sharad-pawar-mumbai

सरकारसत्ता ऑनलाइन – गुजरातचे काँग्रेसचे Congress कार्यकारी अध्यक्ष आणि युवा नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्याचं दिसत आहे. गुजरातमधील स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता पटेल यांनी पवारांची भेट घेतली आहे.

हार्दिक पटेल आणि शरद पवार यांची भेट राजकीय असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. सध्या मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या हार्दिक पटेल यांनी मुंबईतील पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. पटेल यांच्या नेतृत्व गुणाचा आणि ऊर्जेचा काँग्रेसमध्ये Congress योग्य वापर केला जात नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता पटेलांनी घेतलेल्या पवारांच्या या भेटीमुळं विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

हार्दिक पटेलांनी व्यक्त केली खंत

हार्दिक पटेल यांचा काँग्रेस Congress नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi Vadra) यांच्यावर पूर्ण विश्वास आहे; परंतु गुजरात काँग्रेस काळासोबत जायला तयार नाही, अशी खंत पटेल यांनी व्यक्त केली. पटेल यांना आगामी काही दिवसांत गुजरातमध्ये मोठी जबाबदारी देण्याचे संकेत आहेत. त्यामुळं पवारांची त्यांनी घेतलेली भेट ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

काँग्रेसला पुनर्संजीवनी देण्यासाठी हार्दिक पटेलांचं नेतृत्व महत्त्वाचं

अशी माहिती समोर आली की, काँग्रेस नेतृत्वाच्या संमतीनंतरच हार्दिक पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. पक्षाला गुजरात काँग्रेसमध्ये लागलेली गळती पाहता काँग्रेसला Congress पुनर्संजीवनी देण्यासाठी हार्दिक पटेल यांचं नेतृत्व महत्त्वाचं मानलं जात आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात च

Related Posts