IMPIMP

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

by pranjalishirish
Sanjay Nirupam on Raj Thackeray | government fears raj thackeray sanjay nirupam made serious allegations against his own government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे  Raj Thackeray यांनी पत्रकार परिषदेत केले होते. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. शेतकरी मोर्चा, पश्चिम बंगाल निवडणूक सुरु आहे. तिथे कोरोनाची लाट पसरली हे दिसत नाही. मात्र महाराष्ट्रात कोरोना लाट सर्वाधिक पसरतेय, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावरुन काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

संजय निरुपम यांनी राज ठाकरे Raj Thackeray यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे की ‘बहिरा नाचे आपन ताल’ म्हणजे ‘बहिरा व्यक्ती स्वत:च्याच तालावर नाचते’ असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना कोरोनाबाबत जबाबदार धरल्याचं वृत्ताचे कात्रण शेअर केले आहे.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

राज ठाकरे काय म्हणाले होते ?

आधी जो कोरोना आला त्यापेक्षा दुसरी कोरोनाची लाट भयंकर आहे. पण हे महाराष्ट्रातच का वाढतेय ? महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांची संख्याही जास्त आहे. शेतकरी मोर्चा, पश्चिम बंगाल निवडणूक सुरु आहे. तिथे कोरोनाची लाट पसरत असल्याचे दिसत नाही. मात्र महाराष्ट्रात कोरोना लाट सर्वाधिक पसरताना दिसतेय. बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारी माणसं आणि दुसऱ्या राज्यात कोरोना रुग्ण मोजले जात नसल्याने त्यांची आकडेवारी समोर येत नाही. त्या ठिकाणी कोरोना असेल पण संख्या समोर येत नाही.

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

मी मागेही सांगितले होतं, बाहेरून येणाऱ्या माणसांची कोरोना चाचणी करावी, मात्र सरकारने ते केलं नाही. आपण या सगळ्या गोष्टीला बंधन घातल नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक घरात अडकून पडले आहेत. त्यामुळे सगळ्या लोकांची वाताहत होणे हे चांगले लक्षण नसल्याचे राज ठाकरे Raj Thackeray म्हणाले.

Read More : 

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

Related Posts