IMPIMP

Congress | राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांना राज्यसभा की विधानसभेवर संधी? काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष

by nagesh
Congress | rajiv satav wife pradnya satav may get opportunity on rajya sabha or next assembly election ticket

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Congress | नुकतंच निवडणुक आयोगाने राज्यसभेच्या (Rajya Sabha) 6 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक (By-election) घेण्याचा निर्णय घेतला. या 6 जागांपैकी महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे (Congress) खासदार दिवंगत राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. मात्र सातव यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार? याबाबत काँग्रेसच्या (Congress party) गोटात चर्चेला उधान आलं आहे. विशेष म्हणजे राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे.

प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांची काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी (Vice President Congress Committee) नेमणूक करण्यात आली आहे.
परंतु, राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घोषित करण्यात आल्याने रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.
तसेच प्रज्ञा सातव यांना राज्यसभेवर उमेदवारी न देता कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी. अशी देखील चर्चा रंगली आहे.
दरम्यान याबाबत काँग्रेस पक्ष कोणाची वर्णी करणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

राज्यसभेसाठी पोटनिवडणूक (By-election for Rajya Sabha) महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, मध्यप्रदेश येथील रिक्त जागांचा समावेश आहे.
एकूण 6 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे.
सातव यांचं काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळं निधन झालं.
राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते.
त्यामुळे सातव यांच्या निधनाने 2 पदे रिकामी झाली आहेत.
आता राज्यसभेच्या जागेवर कुणाला संधी द्यावी आणि गुजरात काँग्रेस प्रभारी पदी कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : Congress | rajiv satav wife pradnya satav may get opportunity on rajya sabha or next assembly election ticket

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा :-

Crime News | स्विमिंग पूलमध्ये महिला पोलिसासोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस उपाधीक्षकाला अटक

Ajit Pawar | … तरच महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये यश मिळेल – अजित पवार

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित

Related Posts