IMPIMP

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

by pranjalishirish
congress slams sanjay raut statement on sharad pawar as upa head

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut  यांनी, शरद पवार यांनी युपीएच अध्यक्षपद भूषवायला पाहिजे, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. संजय राऊत यांच्या भूमिकेवर काँग्रसकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य हस्यास्पद असल्याचे सांगत त्यांच्या विधानावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नाना पटोले संतप्त; म्हणाले – ‘फडणवीस म्हणजे काय NIA आहे का?

हुसेन दलवाई यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, संजय राऊत Sanjay Raut हे शरद पवार यांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यातल्या सरकारमुळे काँग्रेस नसून काँग्रेसमुळे हे सरकार बनले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वाद निर्माण करताना त्याचं भान संजय राऊत यांनी ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्व देण्याची गरज नसल्याचे दलवाई यांनी म्हटले.

संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोले यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, विषय बनू शकतो ‘गंभीर’

संजय राऊत  Sanjay Raut माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, यूपीए मजबूत व्हावं, अशी काँग्रेस पक्षातील अनेकांची इच्छा आहे. तसेच, युपीएचं नेतृत्व काँग्रेस बाहेरील पक्षाच्या नेत्याने करण्याची मागणी आहे. त्यामुळे शरद पवारांच्या नावाला यूपीएतील कुणाचा विरोध असेल मला वाटत नाही, असे राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘दूध का दूध, पानी का पानी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

संजय राऊत  Sanjay Raut यांनी केलेले विधान हस्यास्पद असून शिवसेनेने आधी काँग्रेस पक्षात यावं मग युपीए अध्यक्षपदासंदर्भात बोलावे, असे दलवाई यांनी म्हटले आहे. तसेच आधी वक्तव्य करतात आणि नंतर अडचणीत येतात. आता त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया हुसेन दलवाई यांनी दिली.

अजित पवारांचा विरोधकांना टोला, म्हणाले -‘आमचे सरकार पडेल ही विरोधकांची पहिल्या दिवसापासूनची इच्छा, पण…’

हुसेन दलवाई पुढे म्हणाले, शिवसेना अद्यापही युपीएमध्ये नाही. असे असताना युपीएचे प्रमुख कोण होणार, हे तुम्हाल सांगण्याचा अधिकार कोणी दिला ? अशी चर्चा करण्याची गरज काय आहे ? स्वत: शरद पवार देखील याला होकार देणार नाहीत. काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष असून याचे नेतृत्व इतर पक्षाचं कुणी कसं करणार ? राष्ट्रवादी हा राज्यातली काही विशिष्ठ गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. सध्या राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या. याचा अर्थ असा होत नाही की युपीएच अध्यक्षपद त्यांना मिळावं, असा समज करुन घेणं चुकीचं असल्याचे दलावाई यांनी संजय राऊतांना सुनावलं.

Also Read : 

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…

परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी

Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त येऊ शकतात अडचणीत

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख

वेगवेगळया विचारसरणींच्या पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारांबाबत इतिहास काय सांगतो ? जाणून घ्या

Related Posts